पैसे वाचवण्यासाठी चक्क विमानाने कॉलेजला जातो विद्यार्थी, महिन्याला करतो मोठी बचत...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 02:35 PM2024-02-20T14:35:05+5:302024-02-20T14:36:14+5:30
विद्यार्थ्याची अनोखी शक्कल पाहून अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत.
Viral Post: कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण पैसे वाचवण्यासाठी पायी किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. पण, एकअसा तरुण आहे, जो चक्क विमानाने कॉलेजला जातो. ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे सत्य आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचे म्हणणे आहे की, भाड्याचे पैसे वाचवण्यासाठी तो दररोज विमानाने कॉलेजला जातो.
टिम चेन असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो कॅलगरीचा रहिवासी आहे आणि ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात शिकतो. त्याने सांगितले की, त्याला आठवड्यातून फक्त दोनच क्लासेससाठी हजर राहावे लागते. त्यासाठी तो विमानाने कॉलेजला जातो. टिमचे कॉलेज व्हँकुव्हरमध्ये आहे. तिथे राहण्याचे घरभाडे खूप जास्त आहे, त्यामुळेच तो विमानाने प्रवास करतो.
Super-commuting
byu/brownsugar1041 inUBC
टिमने सांगितले की, विमानाने प्रवास करण्यासाठी त्याला दररोज फक्त 150 डॉलर्स, म्हणजेच महिन्यात $1200 (रु. 99,631) लागता. तर व्हँकुव्हरमधील एका बेडरुमच्या अपार्टमेंटचे भाडे $2100 (रु. 1,74,358) आहे. म्हणजेच विमानाने प्रवास करुन टिम बरीच बचत करतोय. टीमने स्वतः आपला अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर शेअर केला आहे. टिमच्या पोस्टवर नेटकरी विविध कमेंट करत आहेत. त्याची कल्पना अनेकांना खूप आवडली आहे.