अरे देवा! शाळेत जावं लागू नये म्हणून विद्यार्थ्यांनी तयार केला फेक कोरोना रिपोर्ट, शाळेत उडाली खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 01:14 PM2021-04-10T13:14:29+5:302021-04-10T13:20:14+5:30
कोविड-१९ ट्रेसिंग Appp च्या माध्यमातून फेक कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टही तयार केले आणि शाळेत पाठवले. ज्यानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला.
स्वित्झर्लॅंडमध्ये काही शाळकरी मुलांनी सुट्टीसाठी असं काही नाटक केलं की, एकच खळबळ उडाली. घाईघाईत शाळा बंद करावी लागली. अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांना क्वारंटाईन रहावं लागलं. ज्यूरिखचं स्विस शहर बेसल येथील किर्सगार्टन हाय स्कूल्या तीन विद्यार्थ्यांनी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. जेणेकरून त्यांना शाळेतून सुट्टी मिळावी. तिघांनी कोविड-१९ ट्रेसिंग अॅपच्या माध्यमातून फेक कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टही तयार केले आणि शाळेत पाठवले. ज्यानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला.
१० दिवस शाळा बंद
विद्यार्थ्यांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळताच शाळेचं प्रशासन टेंशनमध्ये आलं. शाळा लगेच १० दिवसांसाठी बंद करण्यात आली. तिन्ही विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं. ही घटना मार्चमध्ये स्प्रिंग ब्रेकच्या ठिक आधी घडली होती. या घटनेमुळे शाळेतील शिक्षकांनाही प्रभावित केलं. सोबतच यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही वाईट प्रभाव पडत आहे. आता हे स्पष्ट झालं आहे की, मुलांनी खोटे रिपोर्ट दिले होते. तर त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी होत आहे. (हे पण वाचा : कोरोनाच्या थैमानामुळे घाबरले आहेत तरूण, मृत्युच्या भीतीने तयार करताहेत मृत्युपत्र!)
हा तर गुन्हा आहे...
बेसेल शिक्षण विभागाचे प्रवक्ता सायमन थेरिएट म्हणाले की, हा काही पोरखेळ किंवा गंमत करण्याचा विषय नाही. एक गंभीर मुद्दा आहे. यासाठी विद्यार्थ्यांना माफ केलं जाऊ शकत नाही. ते म्हणाले की, हा एक गंभीर अपराध आहे. जो तीन विद्यार्थ्यांनी मिळून केलाय. सायमन म्हणाले की, या घटनेमुळे क्लासमधील २५ मुलांना क्वारंटाईन रहावं लागलं. (हे पण वाचा : बोंबला! वाइन दिली नाही म्हणून मॉडलने दिली प्लेन उडवण्याची धमकी आणि मग....)
शाळेतून नाही काढणार
शिक्षण विभाग संबंधित विद्यार्थ्यां विरोधात कायदेशीर कारवाईही करू शकतो. विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याचा कोणताही विचार नाही. सायमन थेरिएट म्हणाले की, 'कोरोना महामारी सुरू असल्याने लहान मुळे चिंतेत आहेत. पण याचा अर्थ हा नाही की, ते शाळेत येण्यापासून वाचण्यासाठी अपराधाची मदत घ्यावी. खोटे आरोग्य कागदपत्रे तयार करणं गुन्हा आहे आणि याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही.