बोंबला! प्रेमात इतका आंधळा झाला ट्रेन ड्रायव्हर, कंट्रोल रूममध्ये गर्लफ्रेन्डला बोलवलं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 06:00 PM2021-08-17T18:00:47+5:302021-08-17T18:01:49+5:30
हे सगळं तेव्हा घडलं जेव्हा ट्रेन प्रवाशांनी भरलेली होती. प्रेमात हरवलेल्या हॅरिस आणि त्याच्या गर्लफ्रेन्डने कंट्रोल रूममध्ये काही फोटो काढले.
प्रेमात कुणी किती वेडं होऊ शकतं याचा अंदाज लावणं जरा अवघड आहे. पण प्रेमात पडल्यावर काही लोक अशा काही चुका करतात ज्याचा भुर्दंड त्यांना आयुष्यभर भोगावा लागतो. न्यूयॉर्क शहरात असाच एका माथेफिरू आशिक सापडला जो व्यवसायाने ट्रेन ड्रायव्हर आहे. हा प्रियकराने आपल्या गर्लफ्रेन्डच्या प्रेमात असं काही केलं की, त्याला तुरूंगाची हवा खावी लागू शकते.
धोक्यात घातला प्रवाशांचा जीव
डेली मेलच्या वृत्तानुसार, ३२ वर्षीय टेरेल हॅरिस शहरात चालणाऱ्या सब वे ट्रेनमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी करतो. पण प्रेमाच्या नादात त्याने असं काही केलं ज्याबाबत वाचल्यावर सगळेच हैराण झाले. त्याने त्याची गर्लफ्रेन्ड डॉमिनिकला डेटसाठी ट्रेनमध्ये बोलवलं. इतकंच नाही तर त्याने कंट्रोलमध्ये गर्लफ्रेन्डला बोलवून तिच्या हाती ट्रेनचा कंट्रोल दिला. (हे पण वाचा : प्रेमासाठी कायपण! गर्लफ्रेन्डला इंग्रजीत फेल होण्याची होती भीती, बॉयफ्रेन्ड मुलगी बनून तिचा पेपर द्यायला गेला आणि....)
हे सगळं तेव्हा घडलं जेव्हा ट्रेन प्रवाशांनी भरलेली होती. प्रेमात हरवलेल्या हॅरिस आणि त्याच्या गर्लफ्रेन्डने कंट्रोल रूममध्ये काही फोटो काढले. गर्लफ्रेन्डने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, 'मी आता ट्रेन चालवत आहे'. फोटोत स्पष्टपणे बघू शकता की, डॉमिनिकच्या हाती ट्रेनचा लिवर आहे.
गेली नोकरी...
आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने यावरून वाद पेटला आहे. यानंतर टेरेल हॅरिसला लगेच नोकरीवरून काढण्यात आलं आणि या प्रकरणाची चौकशी न्यूयॉर्क पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे. टेरेलवर आरोप आहे की, त्याने अनेक स्टॉपर्यंत ट्रेनचा कंट्रोल त्याच्या गर्लफ्रेन्डच्या हाती दिला होता. सोबतच शेकडो लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचं काम केलं. (हे पण वाचा : टॉयलेटमध्ये इंटिमेट झालेल्या कपलचा व्हिडीओ रेकॉर्ड होता तरूण आणि मग झालं असं काही...)
टेरेलच्या गर्लफ्रेन्डने तिच्या या व्हिडीओत सांगतिलं की, तिने एका स्टेशनहून दुसऱ्या स्टेशनला पोहोचल्यावर कंट्रोल पुन्हा बॉयफ्रेन्डच्या हाती दिला. नंतर ती प्रवाशांच्या सीटवर जाऊन बसली. टेरेल हा गेल्या १० वर्षापासून ड्रायव्हरची नोकरी करत होता. पण आता त्याला कंट्रोल रूममध्ये शिरण्याचीही परवानगी नाही. सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही.