सॅलेड विकून महिन्याला लाखो कमवत आहे पुण्याची ही महिला, ३ हजारात सुरू केला होता बिझनेस....
By अमित इंगोले | Published: January 15, 2021 02:26 PM2021-01-15T14:26:59+5:302021-01-15T14:33:05+5:30
पुण्यात राहणाऱ्या मेघा यांना रिअल इस्टेटमधील मोठा अनुभव आहे. याच क्षेत्रात त्यांना पुढे काम करायचं होतं. पण त्यांना तो विचार सोडून सॅलडचा व्यवसाय करायचं ठरवलं.
जास्तीत लोकांना सॅलड खाणं पसंत असतं. याच सलादचा व्यवसाय करून पुण्यातील एका महिलेने नवा उद्योग उभारला आहे. ३ हजार रूपयात सुरू केलेल्या या व्यवसायातून या महिलेने गेल्या साधारण ४ वर्षात २२ लाख रूपयांची कमाई केली आहे. या महिलेचं नाव आहे मेघा बाफना. पुण्यात राहणाऱ्या मेघा यांना रिअल इस्टेटमधील मोठा अनुभव आहे. याच क्षेत्रात त्यांना पुढे काम करायचं होतं. पण त्यांना तो विचार सोडून सॅलडचा व्यवसाय करायचं ठरवलं.
खास बाब ही आहे की, त्यांनी २०१७ मध्ये आपल्या बिझनेसची सुरूवात घरातूनच केली होती. सर्वातआधी त्यांनी चार ओळींची एक क्रिएटीव्ह जाहिरात तयार केली. ही लोकांच्या व्हॉट्सअॅपवर शेअर केली. लवकरच मेघा यांना त्यांची पहिली ऑर्डर मिळाली. पहिल्या दिवशी त्यांना ५ ऑर्डर मिळाल्या. त्यांच्या मित्रांनीच हे ऑर्डर केलं होतं. पुढे हे ऑर्डर वाढत गेले आणि मेघा यांचा व्यवसाय वाढत गेला. मेघा आता एक यशस्वी बिझनेस वुमन झाल्या आहेत.
(Image Credit _ YouTube)
दैनिक भास्करनुसार, मेघासाठी हे यश मिळवणं सोपं नव्हतं. यासाठी त्यांना कठोर मेहनत करावी लागली. रोज सकाळी त्या साडे चार वाजता उठून सॅलेडचे पॅकेट तयार करत होत्या. भाज्या आणण्यापासून ते मसाला तयार करण्यापर्यंत सगळी कामे स्वत: मेघा यांनी केली. अनेकदा तर त्यांना नुकसानही झालं. पण मेघा यांनी काम बंद केलं नाही. मेहनतीला फळ मिळालं आणि मेघा महिन्याला ५ ते ७ हजार रूपये कमाई करू लागल्या.
(Image Credit : DainikBhaskar)
हळूहळू ग्राहक वाढले तर नफाही वाढला. लॉकडाऊनच्या आधीपर्यंत त्यांच्याकडे २०० नियमित ग्राहक झाले होते. आता मेघा महिन्याला ७५ ते १ लाख रूपये बचत करतात. गेल्या चार वर्षात त्यांनी २२ लाख रूपये कमाई केली आहे.