मांजरीमुळे करावी लागली विमानांची इमरजन्सी लॅंडींग, कॉकपिटमध्ये घुसून पायलटवर केला हल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 12:58 PM2021-03-01T12:58:49+5:302021-03-01T13:02:18+5:30

मांजर अचानक कॉकपिटमध्ये आली आणि आक्रामक झाली. तिने एकप्रकारे पूर्ण कॉकपिटला हायजॅक केलं होतं. त्यामुळे विमान खाली उतरवण्याशिवाय पर्याय नव्हता.

Sudan plane makes emergency landing after an angry cat hijacks cockpit | मांजरीमुळे करावी लागली विमानांची इमरजन्सी लॅंडींग, कॉकपिटमध्ये घुसून पायलटवर केला हल्ला...

मांजरीमुळे करावी लागली विमानांची इमरजन्सी लॅंडींग, कॉकपिटमध्ये घुसून पायलटवर केला हल्ला...

Next

विमानांची इमरजन्सी लॅंडींग (Emergency Landing) च्या वेगवेगळ्या घटना नेहमीच समोर येत असतात. कधी विमानात काही बिघाड झाल्याने असं केलं जातं नाही काही विचित्र कारण राहतं. पण सूडानमध्ये (Sudan) एका आक्रामक मांजरीमुळे(Cat) विमानाला परतावं लागलं. सूडानची राजधानी खार्तूम (Khartoum) च्या विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या फ्लाइटमधील पायलटवर मांजरीने हल्ला केला तर एकचं गोंधळ उडाला. यानंतर पायलटकडे विमान परत नेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

स्थानिक मीडिया हाउस अल-सुदानीच्या रिपोर्टनुसार, खार्तूम इंटरनॅशनल एअरपोर्ट (Khartoum International Airport) हून उड्डाण घेतल्यावर साधारण दीड तासांनी अचानक विमानातील एक मांजर कॉकपिट (Cockpit) मध्ये शिरली आणि तिने पायलटवर हल्ला केला. मांजर फारच घाबरलेली होती आणि त्यामळे ती अधिक आक्रामक झाली होती. कॅबिन क्रूच्या सदस्यांनी मांजरीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ते काही जमलं नाही. अखेर विमानाचं इमरजन्सी लॅंडींग करावं लागलं. (हे पण वाचा : ऐकावं ते नवलच! कोंबड्यावर आहे मालकाच्या हत्येचा आरोप, न्यायालयातही व्हावं लागणार हजर)

विमानात आली कशी मांजर?

सूडानच्या तारको एअरलाइन्सचं हे कमर्शिअल विमान कतारची राजधानी दोहासाठी निघालं होतं. रिपोर्टनुसार मांजरीच्या हल्ल्यात कुणालाही इजा झालेली नाही. पण मांजरीचं आक्रामक रूप पाहून सगळे घाबरले होते आणि तिच्यावर कुणाला कंट्रोलही मिळत येत नव्हता. मात्र, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलं नाही की, मांजर विमानात पोहोचली कशी?  (हे पण :मोठ्या हॉटेल्समध्ये एकदा वापरलेल्या साबणांचं पुढे काय केलं जातं?)

काही पर्यायच नव्हता

स्थानिक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, विमान खार्तूम विमानतळावर एका हॅंगरमध्ये उभं करण्यात आलं होतं. शक्य आहे की, याच हॅंगरमध्ये मांजर विमानात शिरली असेल. सध्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तर कॅबिन क्रूने सांगितले की, मांजर अचानक कॉकपिटमध्ये आली आणि आक्रामक झाली. तिने एकप्रकारे पूर्ण कॉकपिटला हायजॅक केलं होतं. त्यामुळे विमान खाली उतरवण्याशिवाय पर्याय नव्हता.
 

Web Title: Sudan plane makes emergency landing after an angry cat hijacks cockpit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.