अबब! भिंतीवर हातोडा मारताच नोटांचे बंडल पडले; रोकड पाहून सर्वांचे डोळे दिपले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 10:56 PM2023-01-30T22:56:27+5:302023-01-30T22:56:41+5:30

मिळालेली कॅश घेऊन प्रॉपर्टी मालकिन अमांडा रिस सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी निघून गेली. अमांडा तिच्या आईसोबत हवाई प्रवास करून सुट्टी घालवली.

Suddenly bundles of notes came out from wall person became sad | अबब! भिंतीवर हातोडा मारताच नोटांचे बंडल पडले; रोकड पाहून सर्वांचे डोळे दिपले

अबब! भिंतीवर हातोडा मारताच नोटांचे बंडल पडले; रोकड पाहून सर्वांचे डोळे दिपले

googlenewsNext

एका मजुराला भिंतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड सापडली ज्याची कुणीही कल्पना केली नव्हती. भिंतीत इतके रुपये पाहून सर्वांचे डोळे दिपले. जवळपास भिंतीत दिड कोटी रुपये लपवण्यात आले होते. एवढी रक्कम सापडूनदेखील मजुराला यातलं काहीच मिळालं नाही. त्यामुळे मजुराला खूप दु:ख झाले. ही घटना अमेरिकेत घडली असून त्याची चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. 

डेलीस्टारनुसार, अमेरिकेत राहणारा मजूर बॉब किट्स क्लेवलेंड एका प्रॉपर्टीत काम करत होते. तेव्हा भिंत तोडताना मजुराला भिंतीत लपवलेले दिड कोटी कॅश सापडली. ही कॅश एका बॉक्समध्ये बंद होती. ती प्रॉपर्टी अमांडा रिस यांची असल्याचं समोर आले आहे. अमांडाने या कॅशच्या बदल्यात बॉबला १० टक्के देण्याचा प्रस्ताव दिला. परंतु बॉब किट्सनं ४० टक्के मागितले. त्यात या दोघांमध्ये वाद झाला. त्यात बॉबला काहीच मिळालं नाही. 

मिळालेली कॅश घेऊन प्रॉपर्टी मालकिन अमांडा रिस सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी निघून गेली. अमांडा तिच्या आईसोबत हवाई प्रवास करून सुट्टी घालवली. त्यासाठी तिने ११ लाख खर्च केले. त्यानंतर अमांडाने भिंतीतून सापडलेल्या कॅशमधून ५० लाख चोरी झाल्याचा दावा केला. परंतु चोरीच्या घटनेबाबत पोलिसांना कुठलेही माहिती दिली नाही. त्याचसोबत बॉक्समध्ये असलेले दुर्मिळ करेन्सी अमांडा यांनी क्वाइन कलेक्टर्सला विकल्याचं समोर आले. तर प्रॉपर्टीत काम करणारा मजूर बॉब किट्सनं दावा केला की, अमांडाने माझ्यावर चोरीचा आरोप केला. त्यामुळे माझ्या बिझनेसवर परिणाम झाला. लोक मला वाईट नजरेने पाहू लागले. मात्र मी काहीही चुकीचे केले नाही. आता हे प्रकरण कोर्टात पोहचले आहे. 
 

Web Title: Suddenly bundles of notes came out from wall person became sad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.