एक असा राजा जो रोज विष खायचा, त्याच्या शरीरावर माशी बसली तरी क्षणात मरायची!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 02:40 PM2020-05-25T14:40:23+5:302020-05-25T15:26:09+5:30
ज्यावेळी त्यांनी गिरनार जूनागड आणि चम्पानेरच्या किल्ल्यांना जिंकलं तेव्हा बेगडा ही पदवी देण्यात आली होती.
जगभरात खाण्याचे शैकिन तुम्ही अनेकदा पाहिले असतील. अनेकांची खाण्यासाठी काहीही करायची तयार असते. पण दिवसाला ३५ किलो अन्न खाणं सामान्य गोष्ट नाही. अनेक पहिलवान आपल्या धष्टपुष्ट शरीराप्रमाणे जास्त खातात. दिवसातून ३५ किलो अन्न क्वचितच एखादी व्यक्ती खात असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका राजाबद्दल सांगणार आहोत. एक राजा एव्हढं अन्न खाऊन पचवत सुद्धा होता. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण हा राजा वीषसुद्धा प्यायचा.
या बादशाहाचं नाव महमूद बेगडा असं होतं. जो राजा गुजरातचा सहावा सुलतान होता. वयाच्या १३ व्या वर्षी या राजाला गादीवर बसण्याची संधी मिळाली. सुमारे ५२ वर्ष या राजाने यशस्वीपणे गुजरातवर राज्य केले. महमूद बेगड़ा या राजाचं नाव महमूद शाह असं होतं.
ज्यावेळी त्यांनी गिरनार जूनागड आणि चम्पानेरच्या किल्ल्यांना जिंकलं तेव्हा बेगडा ही पदवी देण्यात आली होती. असं मानलं की जातं की, गिरनार किल्ल्यावर बेगडा राजाने आक्रमण केल्यानंतर तिथल्या राजांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांना सुल्तानांच्या सेनेत सहभागी करून घेण्यात आलं.
या व्यक्तीच्या आकर्षक व्यक्तीमत्वाची चर्चा आजही सगळीकडे केली जाते. असं म्हणतात की, या राजाची दाढी इतकी मोठी होती की ती कमरेपर्यंत पोहोचत होती. याशिवाय मिश्या सुद्धा खूप लांब होत्या. त्यामुळे मिश्यांना हा राजा आपल्या केसांसोबत बांधत होता.
महमूद बेगडा यांच्याविषयी सगळ्यात जास्त प्रचलित असलेली गोष्ट म्हणजे एका दिवसात कमीतकमी ३५ किलो अन्न खात होता. त्यात एक वाटी मध, एक वाटी लोणी १००-१५० केळी असा भरगच्च आहार असायचा. इतकंच नाही तर रात्रीच्या वेळी सुद्धा उशीच्या आजूबाजूला जेवण ठेवलेलं असायचं. म्हणजेच रात्री भूक लागली तर कधीही खाण्याची सोय होऊ शकते.
असं म्हणतात की, सुल्तान बेगडा हे लहानपणापसूनच विषाचं सेवन करत होतो. त्यामुळे त्यांना रोज जेवल्यानंतर रोज विष पिण्याची सवय होती. असं म्हटलं की जातं की या राजाच्या कपड्यांना कोणीही स्पर्श करत नसे. माश्यासुद्धा या राज्याच्या अंगावर बसल्यानंतर जळून खाक व्हायच्या.
भारीच! कोरोनाच्या भीतीने मुलाने लग्नाला दिला नकार; अन् मुलीने केला 'असा' काही प्रकार