'या' पंतप्रधानाकडे आहेत ४ खरब रूपये किंमतच्या कार्स, कलेक्शन बघून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 11:54 AM2022-01-24T11:54:24+5:302022-01-24T11:57:01+5:30
फॅक हा जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक मानला जातो. तर त्याचे काकाही काही सामान्य व्यक्ती नाही. ते ब्रूनेईचे पंतप्रधान आहेत.
जगभरात असे अनेक अजब लोक आहेत जे त्यांच्या अजब शौकांसाठी ओळखले जातात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याची कारबाबतची क्रेझ पाहून तुम्ही चक्रावून जाल. ही व्यक्ती आहे जगातला सर्वात श्रीमंत फुटबॉलर फॅक बोल्किया जो जेल्सी आणि लीसेस्टर सारख्या मोठ्या क्लबलकडून खेळला आहे. पण आज त्याच्याबाबत नाही तर त्याचे पंतप्रधान काका यांच्याबाबत सांगणार आहोत.
कारची इतकी क्रेझ पाहिली नसेल
फॅक हा जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक मानला जातो. तर त्याचे काकाही काही सामान्य व्यक्ती नाही. ते ब्रूनेईचे पंतप्रधान आहेत. हसनल बोल्किया यांना कार्सची इतकी आवड आहे की, त्यांच्या गॅरेजमध्ये इतक्या गाड्या आहेत तेवढ्या कुणाकडेच नसतील. या पंतप्रधानाकडे जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या गाड्या जगातल्या कोणत्या पंतप्रधानाकडे नसतील.
४ खरब रूपये किंमतीच्या कार्स
हसनल बोल्किया यांच्या कार कलेक्शनची किंमत संपूर्ण मॅनचेस्टर यूनायटेडपेक्षा जास्त आहे. ब्रूनेईच्या पंतप्रधानाचा पुतण्या फॅक बोल्किया, चेल्सी आणि लीसेस्ट सिटीसोबत खेळला आहे. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, त्यांच्या कार कलेक्शनमध्ये ४ बिलियन पाउंड म्हणजे भारतीय मुद्रेनुसार साधारण ४ खरब रूपयांच्या कार आहेत.
जगातले सर्वात श्रीमंत पंतप्रधान
बोल्किया ज्यांची अंदाजे संपत्ती १२ बिलियन पाउंड आहे. त्यांच्याकडे ६०० पेक्षा जास्त रोल्स रॉयस, ५८० पेक्षा अधिक मर्सिडीज बेन्झ, ४५० फरारी आणि ३८० पेक्षा अधिक बेंटले कार्ससोबतच इतरही शेकडो गाड्या आहेत. त्यांच्याकडे जेवढं गॅरेज आहे तेवढं कुणाकडेच नसेल.