Video - हाय गर्मी! रखरखत्या उन्हात गारेगार प्रवास; रिक्षावाल्याचा प्रवाशांसाठी 'देसी जुगाड'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 09:50 AM2023-06-01T09:50:35+5:302023-06-01T09:51:50+5:30
उन्हापासून वाचण्यासाठी लोक एकापेक्षा एक जुगाड करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक हटके व्हिडीओ समोर येत आहे.
एकीकडे सध्या हवामानात सतत बदल होत असल्याचं दिसत असलं तरी दुसरीकडे उन्हापासून वाचण्यासाठी लोक एकापेक्षा एक जुगाड करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक हटके व्हिडीओ समोर येत आहे, जो रखरखत्या उन्हात लोकांना मोठा दिलासा देत आहे. व्हिडिओतील रिक्षावाल्याचा देसी जुगाड पाहून तुम्हीही त्याचं भरभरून कौतुक कराल.
सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ हे सतत जोरदार व्हायरल होत असतात. ज्यामध्ये लोक उष्णतेपासून वाचण्यासाठी आश्चर्यकारक युक्त्या वापरताना दिसत आहेत. या क्रमात कधी कोणी गाडी चालवतानाच भर रस्त्यात अंघोळ करताना देखील पाहायला मिळालं आहे. तर काही जण आणखी वेगळा विचार करतात. अशाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका रिक्षा चालकाने स्वत:ला आणि आपल्या प्रवाशाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी रिक्षात कुलर कसा बसवला हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. निश्चितच ऑटो चालक राईडच्या सुरक्षेपासून ते त्यांच्या आरोग्यापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. रिक्षावालाची ही आश्चर्यकारक कल्पना इंटरनेटवर लोकांना खूश करत आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ खूप पाहिला जात आहे. 22 मे रोजी शेअर करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत 2 लाख 91 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिलेले युजर्स त्यावर एकापेक्षा एक प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं की, 'उन्हाळ्यातही थंडीचा अनुभव.' दुसर्या युजरने लिहिलं की, 'भाईने जनतेचाही विचार केला आहे.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.