'या' ठिकाणी दर 90 मिनिटांनी सूर्य उगवतो आणि मावळतो, NASA ने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 04:33 PM2021-09-23T16:33:19+5:302021-09-23T21:36:02+5:30

सूर्य उगवल्यावर तापमान 250 अंश फॅरेनहाइयपर्यंत वाढतं तर मावळल्यावर -250 अंश फॅरेनहाइटपर्यंत कमी होतं.

The sun rises and sets every 90 minutes in space station, NASA inform | 'या' ठिकाणी दर 90 मिनिटांनी सूर्य उगवतो आणि मावळतो, NASA ने दिली माहिती

'या' ठिकाणी दर 90 मिनिटांनी सूर्य उगवतो आणि मावळतो, NASA ने दिली माहिती

Next

नवी दिल्ली: आपल्याला पृथ्वीवर सूर्य एकदा उगवताना आणि एकदा मावळताना दिसतो. पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल, की अंतराळातील अंतराळ स्थानक(Space Station)मधील अंतराळवीर दररोज 16 वेळा सूर्य उगवण्याचे आणि मावळण्याचे साक्षीदार आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधील अंतराळवीर अनेकदा सोशल मीडियावर अशा पोस्ट शेअर करतात, ज्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो.

इमारतीच्या दुरुस्तीदरम्यान कोसळलं शाळेचं छत, 25 मुलांसह तिघे गंभीर जखम

सूर्य दर 90 मिनिटांनी उगवतो आणि मावळतो
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टसोबत सांगितलं की, अंतराळवीर दर 90 मिनिटांनी सुर्याच्या उगवण्याचे आणि मावळण्याचे साक्षीदार आहेत. इंटरनॅशनल स्टेस स्टेशन दर 90 मिनीटांनी पृथ्वीला गोल चक्कर मारतो. यादरम्यान, स्पेस स्टेसनमधील अंतराळवीरांना दिवसातून 16 वेळा सुर्य उगवताना आणि मावळताना दिसतो.

तापमानात होतो बदल
अंतराळात तापमानात बरेच बदल होत असतात. पृथ्वीच्या तुलनेत अंतराळात सूर्य उगवल्यावर तापमान 250 अंश फॅरेनहाइयपर्यंत वाढतं आणि मावळल्यावर -250 अंश फॅरेनहाइटपर्यंत कमी होतं. पण, यादरम्यान, अंतराळवीर सुरक्षित असतात. त्यांच्यासाठी अशा तापमानाचा सामना करण्यासाठी विशेष स्पेससूट बनवले जातात. या स्पेससूटवर उष्णतेचा काहीच परिणाम होत नाही. 

Web Title: The sun rises and sets every 90 minutes in space station, NASA inform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.