जगातील एक असं शहर जिथे दिवसा घरात लपून बसतात लोक, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:08 AM2024-04-25T11:08:25+5:302024-04-25T12:48:51+5:30
ज्या शहरांमध्ये पाऊस कमी पडत असेल तिथे काय स्थिती राहत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. लोक उष्णतेने हैराण होतात. अशीच काहीशी स्थिती अमेरिकेतील एका शहराची असते.
सध्या देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये उन्हाला पारा चांगलाच वाढला आहे. लोक गरमीने हैराण झाले आहेत. काही ठिकाणी तर घरातून बाहेर निघणंही अवघड झालं आहे. अशात ज्या शहरांमध्ये पाऊस कमी पडत असेल तिथे काय स्थिती राहत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. लोक उष्णतेने हैराण होतात. अशीच काहीशी स्थिती अमेरिकेतील एका शहराची असते. या शहराला सगळ्यात उन्ह असणारं शहर मानलं जातं.
डेली स्टार न्यूज वेबसाइटनुसार, अमेरिकेच्या एरिजोनामध्ये एक शहर आहे. या शहराचं नाव आहे यूमा. या शहराला “Sunniest City on Earth” म्हणजे सगळ्यात जास्त उन्ह असणाऱ्या शहराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड किताब मिळाला आहे. इथे दिवसा इतकं उन्ह असतं की, लोक घरात बसून असतात. इथे 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असतं. तर वर्षाला केवळ 89 mm पाऊस पडतो. त्यामुळे हे ठिकाणी पृथ्वीवरील सगळ्यात कोरड्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे 91 टक्के उन्ह असतं. उन्हाळ्यात इथे 13 तास उन्ह राहतं.
अशात जिथे जास्त उन्ह असतं तिथे पाऊसही कमी होतो. रिपोर्टनुसार, इथे वर्षाला 4055 तास खूप जास्त उन्ह असतं. थंडीच्या दिवसात या शहरात 11 तास उन्ह असतं. उन्हाळ्यात तर इथे रात्रीही तापमान गरम असतं. बाहेरचं तापमान शरीराच्या तापमानापेक्षा जास्त होतं. ज्यामुळे लोक निट झोपूही शकत नाहीत.
यूमा शहरात अनेक देशाच्या उत्तर भागातून थंडीच्या दिवसात यूरिस्ट येतात. ते येथील वातावरण एन्जॉय करतात कारण इथे ढगाळ वातावरण कधीच नसतं. त्यांना कडक उन्हाचा अनुभव मिळतो. हे शहर हायवेच्या जवळ आहे. त्यामुळे लोक इथे थांबून येथील वेगळा अनुभव घेतात.