पैसे घेऊन पुरूषांचा अपमान करते ही तरूणी, 2 तासांची कमाई वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 09:28 AM2022-10-06T09:28:23+5:302022-10-06T09:28:40+5:30
Online Bullying Jennifer Love: आम्ही अशा एका ब्रिटेनची सुपर मॉडल जेनिफर लव्हच्या कमाईबाबत सांगणार आहोत. तिच्या कमाईबाबत वाचाल तर हैराण व्हाल.
Online Bullying Jennifer Love: एक चांगलं आणि शानदार आयुष्य जगण्यासाठी लोक वेगवेगळी कामे करतात. पण काही लोक तर केवळ दोन तास काम करून इतके पैसे कमावतात जेवढे लोक महिनाभर 8 तास काम करूनही कमावत नाहीत. आम्ही अशा एका ब्रिटेनची सुपर मॉडल जेनिफर लव्हच्या कमाईबाबत सांगणार आहोत. तिच्या कमाईबाबत वाचाल तर हैराण व्हाल.
दोन तास काम, दिवसभर आराम
यूकेमध्ये राहणारी 25 वर्षीय जेनिफर लव्हने तिची स्टोरी सोशल मीडियावर सांगत खुलासा केला की, ती केवळ दोन तास काम करून महिन्याला सहजपणे साधारण 7.50 लाख रूपये कमाई करते. पण तिचं काम फारच अजब आहे. जेनिफर पुरूषांचा अपमान करते. म्हणजे 2 तास पुरूषांचा अपमान करून ती इतकी कमाई करते. इतकी कमाई तर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांचीही होत नाही.
कधी होती वेटर आता आहे सुपरस्टार
'वेल्स ऑनलाइन' मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, हे स्पष्ट दिसतं की, नशीब एखाद्याला कुठल्या कुठे नेऊन ठेवतं. सुरूवातील जेनिफर वेटरचं काम करत होती. तेव्हा तिला सीनिअरकडून टोमणे ऐकावे लागत होते. आज ती तिच्या टॅलेंटने इतकी मोठी झाली आहे. लोकांनाही जेनिफर सेवा घेण्यात आणि आपला अपमान करून घेण्यात मजा येते. हेच कारण आहे की, तिची कमाई वाढत जात आहे.
कशी होते कमाई?
दोन वर्षाआधी जेनिफरच्या एका मित्राने तिला तिच्या सुंदर पायांचे फोटो ऑनलाईन विकण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर जेनिफरने 10-20 सेकंदाचे व्हिडीओ तयार करून 5 हजार रूपये दर तासाला कमाई सुरू केली होती. हळूहळू ती क्लाइंटसाठी 5 मिनिटांचे व्हिडीओ बनवू लागली. ज्यात ती त्यांचा भरपूर अपमान करत होती. आता लोकांना तिच्याकडून अपमान करून घेण्यात आनंद मिळतो. त्यासाठी ते तिला भरपूर पैसे देण्यासही तयार असतात.
लोक तिला ‘PayPig’ सेशनमध्ये पैसे देतात. ‘PayPig’ म्हणजे ज्यात लोक पैसे देऊन स्वत: चा अपमान करून घेतात. यूरोपमध्ये हे चलन फार वाढलं आहे.