जगातील बेस्ट सॅंडविचमध्ये मुंबईच्या वडापावला मानाचं स्थान, जाणून घ्या नंबर...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 03:39 PM2024-03-13T15:39:39+5:302024-03-13T15:40:49+5:30
Mumbai Vada Pav : ही या भारतीय फूडसाठी फार मोठी बाब आहे. म्हणजे आता आधीच जगभरात फेमस असलेला मुंबईचा वडापाव आणखी फेमस होणार.
Mumbai Vada Pav : ज्याप्रमाणे प्रवासासाठी लोकल ट्रेन मुंबईची लाइफलाईन आहे. तसाच मुंबईचा वडापाव देखील मुंबईची लाइफलाईन म्हणता येईल. कितीतरी लोक मुंबईत वडापाव खाऊन पोट भरतात. अनेकांचा आवडीचा नाश्ताही वडापावच आहे. याच मुंबईच्या वडापाव जगातील सगळ्यात बेस्ट सॅंडविचमध्ये स्थान पटकावलं आहे. वडापावने जगातील टॉप 50 बेस्ट सॅंडविचमध्ये जागा मिळवली आहे.
फेमस ट्रॅव्हल आणि फूड गाईड TasteAtlas ने या बेस्ट सॅंडविचच्या यादीत 19वं स्थान दिलं आहे. ही या भारतीय फूडसाठी फार मोठी बाब आहे. म्हणजे आता आधीच जगभरात फेमस असलेला मुंबईचा वडापाव आणखी फेमस होणार.
पाव, बटाट्याचा वडा, लाल-हिरवी, चटणी, लसणाची चटणी यांचं मिश्रण असलेला वडापाव लोकांच्या सगळ्यात आवडीच्या फूडपैकी एक आहे. खासकरून मुंबईतील लोकांच्या दिवसाची सुरूवात याच्या नाश्त्याने होते. एक खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटणारा वडापाव आता तर देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी मिळतो. इतका तो फेमस झाला आहे. आता तर जगभरातील बेस्ट 50 सॅंडविचमध्ये त्याला जागा मिळाला आहे. हे काही कमी नाही.
Taste Atlas ने सांगितलं की, स्ट्रीट फूड वडापावची सुरूवात अशोक वैद्य नावाच्या व्यक्तीने केली होती. ते वडापाव 1960-70 दरम्यान मुंबईच्या स्टेशन बाहेर विकत होते. स्वस्तात मिळणारा वडापाव अनेकांचं रोजचं जेवण आहे.