Supermoon 2022: आज पृथ्वीच्या जवळ येणार चंद्र; भारतीयांना 'या' वेळेला पाहायला मिळणार सुपरमूनचे मनमोहक दृष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 04:55 PM2022-07-13T16:55:16+5:302022-07-13T16:55:45+5:30

Supermoon 2022: सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे, ज्यामध्ये चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो.

Supermoon 2022: Moon approaches Earth today; Indians will get to see the captivating view of Supermoon | Supermoon 2022: आज पृथ्वीच्या जवळ येणार चंद्र; भारतीयांना 'या' वेळेला पाहायला मिळणार सुपरमूनचे मनमोहक दृष्य

Supermoon 2022: आज पृथ्वीच्या जवळ येणार चंद्र; भारतीयांना 'या' वेळेला पाहायला मिळणार सुपरमूनचे मनमोहक दृष्य

googlenewsNext

Supermoon 2022 Date: आज म्हणजेच 13 जुलै 2022 रोजी सुपरमून दिसणार आहे. सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे, ज्यामध्ये चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो. पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे चंद्र पृथ्वीपेक्षा मोठा दिसू लागतो. सुपरमूनसोबतच आज आषाढ शुक्ल पक्षाची पौर्णिमा आहे, ज्याला गुरु पौर्णिमा असेही म्हणतात. असे मानले जाते की, या दिवशी गुरूंच्या आशीर्वादाने धन, सुख आणि शांती प्राप्त होते.

याला 'बक सुपरमून' असेही म्हणतात
13 जुलै रोजी होणाऱ्या सुपरमूनला 'बक मून' असे नाव देण्यात आले आहे. या काळात हरणाच्या डोक्यावर नवीन शिंगे उगवतात. त्यामुळे याला बक मून असे नाव पडले आहे.सामान्यतः पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील सरासरी अंतर 384,400 किमी असते, परंतु सुपरमूनच्या दिवशी हे अंतर काही काळ कमी होते.

सुपरमूनची तारीख आणि वेळ
नासाच्या रिपोर्टनुसार, सुपरमून 2 ते 3 दिवस दिसू शकतो. भारतीय वेळेनुसार 13 जुलै रोजी रात्री 12.8 वाजता दिसणार आहे. तो सलग तीन दिवस दिसेल. आज चंद्र पृथ्वीपासून सुमारे 3,57,264 किमी अंतरावर असेल. विशेष म्हणजे यावेळी सूर्य पृथ्वीच्या कक्षेपासून सर्वात दूरच्या बिंदूवर असेल. दरम्यान, 2023 मध्ये, 3 जुलै रोजी सुपरमून दिसणार आहे.

सुपरमून म्हणजे काय?
जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा "सुपरमून" होतो. 1979 मध्ये रिचर्ड नॉल यांनी याला सुपरमून असे नाव दिले. वर्षातून 3 ते 4 वेळा सुपरमून होतात. सुपरमूनला डिअर मून, थंडर मून, आणि विर्ट मून असेही म्हणतात. सुपरमूनच्या दिवशी चंद्र सामान्य दिवसांपेक्षा मोठ्या आकारात दिसतो.

Web Title: Supermoon 2022: Moon approaches Earth today; Indians will get to see the captivating view of Supermoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.