पुष्पाची क्रेझ! रील्सनंतर आता बाजारात आली अल्लू अर्जुन आणि रश्मिका प्रिंट साडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 04:04 PM2022-02-12T16:04:12+5:302022-02-12T16:06:05+5:30

Pushpa Print Saree : श्रीवल्ली गाण्यावर तर हजारो रील्स तयार करण्यात आले. डायलॉग्सचे अनेक मीम्स व्हायरल झाले. आता तर या सिनेमातील सीन्सचे फोटो असलेली साडी बाजारात आली आहे.

Surat shop sells Pushpa print saree featuring Allu Arjun and Rashmika | पुष्पाची क्रेझ! रील्सनंतर आता बाजारात आली अल्लू अर्जुन आणि रश्मिका प्रिंट साडी!

पुष्पाची क्रेझ! रील्सनंतर आता बाजारात आली अल्लू अर्जुन आणि रश्मिका प्रिंट साडी!

googlenewsNext

साऊथ इंडियन सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) च्या 'पुष्पा' सिनेमाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. या सिनेमाची क्रेझ देशातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांवरही बघायला मिळत आहे. सिनेमाची कथा, गाणी, डायलॉग, अभिनय या सर्वांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. श्रीवल्ली गाण्यावर तर हजारो रील्स तयार करण्यात आले. डायलॉग्सचे अनेक मीम्स व्हायरल झाले. आता तर या सिनेमातील सीन्सचे फोटो असलेली साडी बाजारात आली आहे.

India Today च्या रिपोर्टनुसार, सूरजच्या मार्केटमध्ये कपड्यांची एकपेक्षा एक व्हेरायटी मिळते. दुकान चरंजीत क्रिएशनने 'पुष्पा' प्रिंट असलेली साडी तयार केली आहे. दुकानाचा मालक चरणपाल सिंह यांना ही आयडिया सिनेमाच्या लोकप्रियतेवरून आली. सिंह यांनी काही सॅम्पल तयार केले आणि फोटो सोशल मीडियावर शेअऱ केले. काही दिवसातच देशभरातील कपडा व्यापाऱ्यांनी या साडीची ऑर्डर केली. आता वेगवेगळ्या राज्यात या साडीची डिमांड वाढल्याचं त्यांनी सांगितलं.  

दरम्यान डिसेंबर २०२२ मध्ये 'पुष्पा' सिनेमाचा दुसरा भाग रिलीज करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. फिल्म मेकर्सनी आश्वासन दिलं आहे की, दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा जास्त जबरदस्त असेल. अल्लू अर्जुनने एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, दुसरा भाग देशभरातील वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज करण्यात येईल. त्याने दावा केला होता की, याआधी एकत्र इतक्या भाषांमध्ये कोणताही सिनेमा रिलीज केला गेला नाही.
 

Web Title: Surat shop sells Pushpa print saree featuring Allu Arjun and Rashmika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.