आश्चर्य! 'या' गावातील प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख आहे 1 जानेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 02:27 PM2017-10-27T14:27:43+5:302017-10-27T14:39:04+5:30
हरिद्वारपासून २० किलोमीटरवरील खाटा गावात एक अजब प्रकार पाहायला मिळतो आहे. या गावातील प्रत्येक व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी रोजी झाल्याचं चित्र समोर आलं आहे.
देरहराडून- हरिद्वारपासून २० किलोमीटरवरील खाटा गावात एक अजब प्रकार पाहायला मिळतो आहे. या गावातील प्रत्येक व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी रोजी झाल्याचं चित्र समोर आलं आहे. त्या गावातील प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख जन्मतारीख १ जानेवारी असून प्रत्येकाच्या आधारकार्डावर 1 जानेवारी ही जन्मतारीख आहे.
आधार कार्डावर असलेल्या माहितीनुसार, खाटा गावातील मोहम्मद खानची जन्मतारीख १ जानेवारी आहे. त्यांचे शेजारी अलफदीन यांचाही जन्म १ तारखेचाच आहे. त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा जन्म १ जानेवारी आहे. ही परिस्थिती फक्त एकाच कुटुंबाची आहे. इतर कुटुंबामध्येही सारखंच चित्र पाहायला मिळतं आहे. पण या गावातील ८०० कुटुंबांतील प्रत्येक सदस्याच्या जन्म आधार कार्डावरील नोंदीनुसार १ जानेवारीलाच झालेला आहे. ग्रामस्थांनी आधार्ड कार्ड तयार करताना आपली ओळखपत्रं आणि मतदान ओळखपत्र सादर केले होते. तरीही आधार्ड कार्ड नोंदणी करणाऱ्या एजन्सीनं हा गोंधळ केल्याची चर्चा आहे.
आम्हाला विशेष ओळखपत्र क्रमांक दिला जाईल, असं सांगितलं होतं. पण यात विशेष काय आहे? सगळ्यांची जन्मतारीख एकच छापली आहे, असं अलफदीन यांनी म्हंटलं आहे.
जन्मतारीखेशिवाय जन्मवर्षही मतदान आणि रेशन कार्डावरील तारखेपेक्षा वेगळी छापून आली आहे. तेथील काही वृद्धांचं वय 22 वर्ष तर काही मुलांचं वय 15 ते 60 वर्षांपर्यंत छापून आलं आहे, असं ग्रामस्थांनी सांगितलं आहे. ग्रामस्थांनी रेशन कार्ड आणि मतदान ओळखपत्रांच्या कॉपी एजन्सीकडे दिल्या होत्या. ही चूक संबंधित एजन्सीची आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वीच आधार कार्ड तयार करण्यासाठी माहिती जमा केली होती. या गोंधळामुळे आता सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहू, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. उपसरपंच मोहम्मद इम्रान यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
आधार कार्डातील गोंधळाचा हा पहिलाच प्रकार नाही. याआधी ऑगस्टमध्ये आग्रा जिल्ह्यातील तीन गावे आणि अलाहाबादमधील एका गावातही सर्व ग्रामस्थांची जन्मतारीख १ जानेवारी छापण्यात आली होती.
दरम्यान, युआयडीएआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून कुठलीही चूक झाली नसल्याचं म्हंटलं आहे.