काय आहे अमेरिकेतील 'एरिया - ५१'? इथे खरंच एलियनवर रिसर्च होतो का?  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 04:30 PM2019-07-18T16:30:48+5:302019-07-18T16:37:27+5:30

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील 'एरिया ५१' बाबत सोशल मीडिया चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे या ठिकाणाबाबत लोकांमध्ये आणखीनच उत्सुकता वाढली आहे.

Surprising facts about most secret place of earth Area 51 | काय आहे अमेरिकेतील 'एरिया - ५१'? इथे खरंच एलियनवर रिसर्च होतो का?  

काय आहे अमेरिकेतील 'एरिया - ५१'? इथे खरंच एलियनवर रिसर्च होतो का?  

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील 'एरिया ५१' बाबत सोशल मीडिया चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे या ठिकाणाबाबत लोकांमध्ये आणखीनच उत्सुकता वाढली आहे. अमेरिकेतील नेवादाजवळील वाळवंटात दूरदूरपर्यंत एक परिसर आहे. तो म्हणजे एरिया ५१. या ठिकाणाबाबत अनेक वर्षांपासून लोकांमध्ये उत्सुकता आहे. तर अनेकांना या ठिकाणाबाबत काहीच माहीत नाही. पण या ठिकाणी एलियन्सना बंद करून ठेवल्याची अफवा आहे.

सोशल मीडियावर ही अफवा वेगाने पसरली आणि फेसबुकवर एक इव्हेंट तयार केला गेलाय त्यानुसार, २० सप्टेंबर २०१९ ला एरिया ५१ मध्ये जाण्याचा प्लॅन करण्यात आला आहे. तब्बल ९ लाख लोकांनी यात इंटरेस्ट दाखवला आहे. पण हे एक केवळ वायुसेनेचं प्रशिक्षण केंद्र असल्याचं अमेरिकन वायुसेनेने सांगितले आहे. चला जाणून घेऊ या ठिकाणाबाबत काय बोललं जातं.

काय आहे एरिया ५१?

(Image Credit : New York Post)

'एरिया ५१' हा अमेरिकेतील सर्वात मोठा परिसर आहे. इथे एक मिलिटरी बेस आहे. अमेरिकेपासून ९० किमी दूर लास वेगासमध्ये हे ठिकाण आहे. एरिया ५१ हा ८५ हजार एकर परिसरात पसरलेला आहे. तर इथे विमाने आणि शस्त्रास्त्रांची टेस्ट केली जात असल्याचे वायुसेनेकडून सांगण्यात येते. पण या ठिकाणाबाबत अनेक रहस्य आहेत. जी कधीच कुणाला कळाली नाही. त्यामुळे सतत त्यावर चर्चा सुरू असते.

एलियन्सवर शोध?

जगभरातील लोकांना या रहस्यमय ठिकाणाबाबत जाणून घ्यायचं आहे. अनेकजण या ठिकाणाबाबत वेगवेगळी मतं व्यक्त करतात. कुणी सांगतं की, इथे गपचूप एलियन्सवर शोध केला जातो. तर कुणी म्हणतं की, याच ठिकाणी एक एलियन यान यूएफओ १९४७ मध्ये क्रॅश झालं होतं. पण २०११ मध्ये एनी जेकोबसन नावाच्या व्यक्तीने त्याच्या पुस्तकात या गोष्टीचं खंडन केलं होतं. इथेच यूएस आर्मीने पहिल्यांदा ड्रोन टेस्टिंग केली होती. ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी ज्या ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर्सची मदत घेतली गेली होती. त्यांची ऑपरेशनआधी इथेच टेस्ट घेण्यात आली होती.

परिसरात एलियन्स दिसतात?

इथे एलियन्स दिसत असल्याचा दावा काही लोकांनी केला होता. पण याचा काहीही पुरावा नाहीये. तसेच काही रिसर्चमध्ये असंही सिद्ध झालं आहे की, इथे अमेरिकेकडून इथे गुप्त प्रकारे रिसर्चही केला जातो. इथे यूएस आर्मीने त्यांच्या पहिल्या ड्रोनची टेस्टिंग केली होती. त्याचं नाव डी २१ होतं. आजही एरिया ५१ च्या रहस्यावरून पडदा उठलेला नाहीये. अनेकांना प्रश्न पडला आहे की, इथे असं काय आहे की, हा एरिया प्रतिबंधित केला आहे. 

फोटो आले होते समोर

मीडिया रिपोर्टनुसार, एरिया ५१ चे काही फोटो समोर आले आहेत. त्यात मृत एलियनही दिसत आहेत. पण या फोटोबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. या परिसराशी संबंधित एक्स फाइल्स, दुसऱ्या ग्रहावरील पायलट आणि तबकड्यांशी अनेक किस्से आहेत. इथे कुणालाही जाण्याची परवानगी दिली जात नाही. पहिल्यांदा एका सायन्स चॅनेलवर काही फोटो बघायला मिळाले होते. या फोटोंमध्ये जानेवारी १९६३ मध्ये झालेल्या ए-१२ विमानाला झालेली दुर्घटना बघायला मिळते. नंतर या विमानाला एसआर - ७१ ब्लॅकबर्ड असं नाव देण्यात आलं होतं.

शीतयुद्धाच्या काळात अमेरिकने एअरफोर्स, सीआयए आणि नासा सुपरसोनिक आणि स्टीस्थ टेक्नॉलॉजीमध्ये केलेल्या विकासाला जगापासून लपवून ठेवायचे होते. त्यावेळी ए-१२ हे विमान २२०० मैल प्रति तासाच्या वेगाने उड्डाण घेऊ शकत होतं. हा स्पीड रडारमध्ये कॅच केला जाऊ शकत नव्हता. तसेच विमानाला अल्ट्रा सेसिंटिव्ह कॅमेरे होते. जे ९० हजार फूटाहूनही जमिनीवरचे स्पष्ट फोटो काढू शकत होते.

असे म्हटले जाते की, या ठिकाणी एक ग्रूम नावाचा तलाव आहे. याबाबत गूगल मॅपवर काहीच माहिती नाही. या तलावाच्या बाजूनेच एक रनवे आहे. इतकेच नाही तर इथे एकूण ७ रन-वे आहेत. ज्यावरून गुप्तपणे विमान उड्डाण घेतात.

चंद्र मोहिम खोटी?

जगात असेही काही लोक आहेत जे नील आर्मस्ट्रॉंग कधी चंद्रावर गेलाच नाही असे मानतात. एरिया ५१ मध्ये अमेरिकेने फेक सेटअप करून त्यांच्याकडून चंद्रावर लॅंड केल्याची खोटी अ‍ॅक्टिंग करवून घेतल्याचे बोलले जाते. पण याबाबत काहीही पुरावे नाहीत.

बंदुकीच्या धाकाने रिकामा केला एरिया

असे म्हणतात की, या एरियाच्या आजूबाजूला जेवढे लोक राहत होते, त्यांना अमेरिकन मिलिटरी फोर्सने जबरदस्तीने तेथून काढले होते. त्यांना कोणत कारणही सांगण्यात आलं नव्हतं. पण ज्यांनी तेथून जाण्यास मनाई केली, त्यांना बंदुकीचा धाक दाखवून तेथून पळवले होते. 
 

Web Title: Surprising facts about most secret place of earth Area 51

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.