वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाला सुरुवात; कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 10:05 PM2024-04-08T22:05:52+5:302024-04-08T22:08:36+5:30
5 तास 10 मिनिटे चालणारे हे सूर्यग्रण 54 वर्षांनंतर होत आहे.
Surya Grahan 2024: 2024 मधील पहिल्या सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. हे ग्रहण अतिशय खास मानले जाते, कारण हे पूर्ण सूर्यग्रहण आहे. या ग्रहणाचा कालावधी सुमारे 5 तास 10 मिनिटे आहे. भारतीय वेळेनुसार ग्रहण रात्री 9:12 वाजता सुरू झाले असून, रात्री/पहाटे 2:22 पर्यंत चालेल. सूर्यग्रहणाच्या वेळी भारतात रात्र आहे, त्यामुळे सूर्यग्रहण भारतीयांना दिसणार नाही. अमेरिका, कॅनडा, कोलंबिया, व्हेनेझुएला, आयर्लंड, पोर्तुगाल, नॉर्वे, पनामा, रशिया, बहामा इत्यादी देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसेल.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण सूर्यग्रहण असून, 54 वर्षांनंतर इतके मोठे सूर्यग्रहण होत आहे. या सूर्यग्रहणामुळे पृथ्वीच्या काही भागात पूर्ण अंधार असेल. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमींसह सर्वसामान्यांमध्येही मोठा उत्साह आहे. या सूर्यग्रहणाचा कालावधी पाच तासांपेक्षा जास्त आहे. इतकेच नाही, तर सात मिनिटांपेक्षा जास्त काळ सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकणार नाही.
सूर्यग्रहणामुळे येथे रात्र होणार आहे
8 एप्रिलच्या रात्री होणाऱ्या सूर्यग्रहणाच्या प्रभावाखाली पृथ्वीचा काही भाग असेल. गेल्या 54 वर्षांतील हे सर्वात मोठे सूर्यग्रहण आहे. यापूर्वी 1970 मध्ये इतके मोठे सूर्यग्रहण झाले होते. नासाच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण सूर्यग्रहणादरम्यान अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील डलास शहर, अमेरिकेतील आर्कान्सा राज्यातील लिटल रॉक शहर, अमेरिकेच्या ओहायो राज्यातील क्लीव्हलँड शहर गडद अंधारात बुडून जाईल.