इथे पुरूष कोणत्याही तरूणीला करू शकतात 'किस', हे आहे कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 04:07 PM2019-03-04T16:07:15+5:302019-03-04T16:22:32+5:30
मुलीला किस करण्याआधी सहभागी व्यक्तीला फाऊंटेनमध्ये उडी घ्यावी लागते.
दक्षिण-पश्चिम जर्मनीमध्ये सध्या अल्मेनिक कार्निव्हल साजरा केला जात आहे. हा कार्निव्हल दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या गुरूवारी सुरू होतो आणि मार्चच्या पहिल्या बुधवारी संपतो. सध्या या कार्निव्हलचे खास फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
तसा तर जर्मनीमध्ये उत्सव आणि पार्टीचं वातावरण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतं. पण सध्या इथे पूर्ण दक्षिण-पश्चिम जर्मनीमध्ये परेडसोबतच अल्मेनिक कार्निव्हल साजरा केला जात आहे. या परेडचा सर्वाच खास दिवस असतो सोमवार. सोमवारला परेडला रोड मंडे, हायलाइट नावाने ओळखले जाते.
या कार्निव्हलदरम्यान मुंडेरकिंगमध्ये कार्निव्हल परेडला ट्रेडीशनल रूपाने तरूण मंडळी मुख्य चौकातून फाऊंटेनपर्यंत घेऊन जाता. त्यानंतर त्यांना आजूबाजूला असलेल्या कोणत्याही मुलीला किस करण्याची संधी मिळत असते.
मुलीला किस करण्याआधी सहभागी व्यक्तीला फाऊंटेनमध्ये उडी घ्यावी लागते. या फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता की, लोक कशाप्रकारे मुलींना किस करताना दिसत आहेत.
जर्मनीमध्ये कार्निव्हल खासकरून रोजेनमोंटाकच्या जवळपास साजरा केला जातो. याला फिफ्थ सीजन असंही म्हटलं जातं. संपूर्ण जर्मनीमध्ये हे कार्निव्हल वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं.
गुरूवारी सुरू होणाऱ्या या कार्निव्हलला पश्चिम जर्मनीमध्ये 'महिला दिवस' म्हणूनही ओळखलं जातं. तेथील पौराणिक कथांनुसार, धोबी महिलांकडून १८२४ मध्ये करण्यात आलेल्या एका विद्रोहाच्या आठवणीत महिला शहरातील हॉलमध्ये शिरतात.
तेथील पुरूषांचे टाय कापतात आणि तसेच त्यांना त्यांच्या मार्गाने जात असलेल्या कोणत्याही माणसाचं चुंबन घेण्याची परवानगी असते. तेच दक्षिण-पश्चिम जर्मनीमध्ये याला 'स्वाबियन-अल्मेनिक' कार्निव्हलच्या नावाने ओळखलं जातं.