'ती' आंघोळ करत होता, तितक्यात आला शार्क; नंतर जे झालं ते पाहून व्हाल हैराण,Video पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 03:32 PM2023-01-04T15:32:51+5:302023-01-04T15:45:56+5:30

पाण्यात मोठे मासे कशी दहशत निर्माण करतात हे या चित्रपटात अनुभवायला मिळते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला. 

Swimmer spots drone but not approaching tiger shark in australia | 'ती' आंघोळ करत होता, तितक्यात आला शार्क; नंतर जे झालं ते पाहून व्हाल हैराण,Video पाहाच

'ती' आंघोळ करत होता, तितक्यात आला शार्क; नंतर जे झालं ते पाहून व्हाल हैराण,Video पाहाच

Next

तुम्हाला एक हॉलिवूड चित्रपट आठवत असेल. या चित्रपटाचे नाव होते 'द मेग'. पाण्यात मोठे मासे कशी दहशत निर्माण करतात हे या चित्रपटात अनुभवायला मिळते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला. 

सदर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक महिला बीचवरील एका समुद्रात आंघोळ करत आहे. याचदरम्यान तेथे हळूहळू एक भला मोठा शार्क त्या व्यक्तीच्या जवळ येत होता. हे संपूर्ण प्रकरण ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये, शार्क पाण्यात आंघाोळ करणाऱ्या महिलेच्या अगदी जवळ येतो हे दिसत आहे. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाचा आहे. हे २८ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर शेअर केले गेले. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक सदर प्रकार खूप धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया देत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण आहे ऑस्ट्रेलियातील पर्थमधील. सुमारे १४ फूट असणाऱ्या टायगर शार्कच्या उपस्थितीने सर्वांना आश्चर्यचकित केले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक पूर्णपणे स्तब्ध झाले.

Web Title: Swimmer spots drone but not approaching tiger shark in australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.