'या' हॉटेलला ना छत ना भिंती, एका रात्रीसाठी इतकं द्यावं लागतं भाडं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 03:02 PM2019-05-06T15:02:27+5:302019-05-06T15:09:48+5:30

हॉटेल म्हटलं की, कुणाच्याही डोळ्यांसमोर टोलेजंग इमारती, समोर स्वीमिंग पूल, सुंदर गार्डन असं चित्र येत असेल.

Switzerland Null Stern Open Air hotel with only one queen size bed with no roof and wall | 'या' हॉटेलला ना छत ना भिंती, एका रात्रीसाठी इतकं द्यावं लागतं भाडं!

'या' हॉटेलला ना छत ना भिंती, एका रात्रीसाठी इतकं द्यावं लागतं भाडं!

Next

हॉटेल म्हटलं की, कुणाच्याही डोळ्यांसमोर टोलेजंग इमारती, समोर स्वीमिंग पूल, सुंदर गार्डन असं चित्र येत असेल. या गोष्टींशिवाय हॉटेलची कल्पनाच करत नाही. पण जगात एक अशीही हॉटेल रूम आहे जी खुल्या आकाशाखाली आहे. ही एकप्रकारे ओपन एअर हॉटेल रूम आहे. स्वित्झर्लॅंड हिरव्यागार सुंदर डोंगरांच्या मधोमध ही रूम आहे. 

या हॉटेलचं नाव आहे  the null stern hotel. या हॉटेलची खासियत ही आहे की, याच्यावर ना छत आहे ना या या रूमला भिंती. इथे केवळ एक क्वीनसाइज सुंदर बेड लागला आहे. ज्यावर पांढऱ्या रंगाची चादर अंथरलेली आहे. तसेच या बेडच्या आजूबाजूला लॅम्प सेट लावले आहेत. 

(Image Credit : HiConsumption)

इथे एका बेडशिवाय दुसरं काहीही नाही. भलेही ऐकायला हे जरा विचित्र वाटत असेल. पण हे फोटो पाहिल्यावर कुणाचीही एकदा इथे जाण्याची नक्कीच होईल. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून ६ हजार ४६३ फूट उंचीवर आहे. इथे एक रात्र थांबण्याचं भाडं १५ हजार रूपये आहेत. 

(Image Credit : PopSugar)

जर्मनीत या हॉटेलच्या नावाचा अर्थ आहे झीरो स्टार्स. सामान्यपणे जगभरातील हॉटेल्सची क्वालिटी ही त्यांच्या स्टार्सवरून पाहिली जाते. जसे की, ५ स्टार, ७ स्टार. पण या हॉटेलच्या नावाचा अर्थ झीरो स्टार आहे. हे हॉटेल २०१६ मध्ये लॉन्च झालं होतं आणि २०१७ मध्ये बुकिंग सुरू झाली होती. आता इथे येणाऱ्यांची संख्या फारच वाढली आहे. त्यामुळे हॉटेलचे मालक असे आणखी रूम्स करण्याचा विचार करत आहेत. हॉटेलचे को-फाउंडर यांचं मत आहे की, इथे येणारे गेस्टच त्यांचे स्टार्स आहेत. 

Web Title: Switzerland Null Stern Open Air hotel with only one queen size bed with no roof and wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.