पहिल्याच डेटला तरुणीची फसवणूक, हॉटेलचं बिल न देताच पार्टनर फरार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 11:06 AM2018-06-19T11:06:49+5:302018-06-19T11:06:49+5:30

पहिली डेट म्हटलं की कुणीही उत्साहित असतं. पण त्यासोबतच मनात अनेक प्रश्नही सुरु असतात. काही लोक तर आपली डेट नेहमीसाठी यादगार व्हावी म्हणून भरपूर प्लॅनिंगही करतात.

Sydney : On first date man leaves woman with full bill at Resturant | पहिल्याच डेटला तरुणीची फसवणूक, हॉटेलचं बिल न देताच पार्टनर फरार!

पहिल्याच डेटला तरुणीची फसवणूक, हॉटेलचं बिल न देताच पार्टनर फरार!

Next

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सिडनी : पहिली डेट म्हटलं की कुणीही उत्साहित असतं. पण त्यासोबतच मनात अनेक प्रश्नही सुरु असतात. काही लोक तर आपली डेट नेहमीसाठी यादगार व्हावी म्हणून भरपूर प्लॅनिंगही करतात. पण जरा विचार करा की, तुमची पहिली डेटच तुमच्या जीवनातील सर्वात वाईट डेट ठरेल तर कसं वाटेल? 

असाच काहीसा किस्सा सिडनी शहरात घडला आहे. सिडनीतील एका रेस्टॉरंटने दावा केलाय की, त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये एक कपल डेटला आलं होतं. पण हैराण करणारी बाब म्हणजे तरुणीचा पार्टनर कॅश आणण्याचं कारण देत 100 डॉलरच्या बिलासोबत तरुणीला एकटं सोडून पळाला.

या रेस्टॉरंटचा मालक क्रिसटियन अवांट याने त्याने त्याच्या फेसबुक पेजवर हा किस्सा शेअर केलाय. यात त्याने लिहिलं आहे की, 'एक कपल डेटसाठी एम एल बोंडीला आलं होतं. त्यांनी भरपूर खाल्लं. नंतर डेटला आलेला तरुण कॅश आणण्याचं सांगत तरुणीला एकटं सोडून बाहेर गेला आणि परत आलाच नाही'.

या हॉटेलच्या मालकाने एका मुलाखतीत सांगितलं की, कपलला पाहून हे स्पष्ट दिसत होतं की, त्यांच्यात सगळंकाही ठिक नाहीये. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा उत्साह किंवा प्रेम दिसत नव्हतं. त्यामुळे आम्ही त्यांना फ्रि कॉकटेलही दिलं होतं. जेणेकरुन त्यांच्यातील ताण कमी व्हावा'.

त्याने पुढे सांगितलं की, 20 मिनिटे होऊनही जेव्हा तो परत आला नाही तेव्हा त्या तरुणीने डेटला सोबत आलेल्या तरुणाला फोन करण्याचा प्रयत्न केला होता. पण तोपर्यंत त्याने त्या तरुणीचा नंबर ब्लॉक केला होता.

नंतर तो तरुण परत न आल्याने तरुणी नाराज झाली होती. पण हॉटेलच्या स्टाफने त्या तरुणीला दिलासा दिला. इतकेच नाहीतर त्या तरुणीकडून बिलाचे पैसेही घेतले नाही आणि उलट तिलाट 150 डॉलर दिले.

Web Title: Sydney : On first date man leaves woman with full bill at Resturant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.