बापरे बाप इतकं खोटं! सुट्टीसाठी त्यांने सांगितलं चारवेळा लग्न अन् तीन वेळा घटस्फोटाचं कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 02:22 PM2021-04-15T14:22:46+5:302021-04-15T14:23:13+5:30

त्याने लग्नासाठी सुट्टी मागितली तर त्याला ऑफिसकडून ८ दिवसांची सुट्टी मिळाली. इतकी कमी सुट्टी मिळाल्याने तो चांगलाच नाराज झाला.

Taiwan man 4 times married 3 times divorced with same girl | बापरे बाप इतकं खोटं! सुट्टीसाठी त्यांने सांगितलं चारवेळा लग्न अन् तीन वेळा घटस्फोटाचं कारण....

बापरे बाप इतकं खोटं! सुट्टीसाठी त्यांने सांगितलं चारवेळा लग्न अन् तीन वेळा घटस्फोटाचं कारण....

Next

ऑफिसमधून सुट्टी मिळवण्यासाठी वेगवेगळी कारणं सांगणं सामान्य बाब आहे. लोक अनेकदा खोटी कारणे सांगतात आणि सुट्टीवर जातात. पण एक व्यक्ती अशी आहे जी खोटं बोलण्यात इतकी पुढे आहे की, मोठमोठे खोटं बोलणारे त्याच्यासमोर पाणी भरतात. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, या व्यक्तीने ७ पेक्षा जास्त वेळा जास्त दिवसांची सुट्टी घेतली. ती सुद्धा पगारी सुट्टी.

ही व्यक्ती तायवानची राहणारी आहे. त्याने एका एकाच महिलेसोबत ४ वेळा लग्न केलं आणि त्याच महिलेसोबत ३ वेळा घटस्फोटाच्या नावावर एक महिन्यापेक्षा जास्त सुट्टी घेतली. ही व्यक्ती तायपेमधील एका बॅंकेत काम करते. तो या बॅंकेत क्लार्क आहे. त्याने सुट्टी मिळवण्यासाठी ४ वेळा लग्न केलं आणि ३ वेळा घटस्फोट घेतला. (हे पण वाचा : बुलेट दिली नाही म्हणून नवरदेवाचा हाय व्होल्टेज ड्रामा, घोडीवरून उतरून सर्वांसमोर काढले कपडे आणि...)

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, त्याने लग्नासाठी सुट्टी मागितली तर त्याला ऑफिसकडून ८ दिवसांची सुट्टी मिळाली. इतकी कमी सुट्टी मिळाल्याने तो चांगलाच नाराज झाला. त्यानंतर त्याने डोकं लावून आपली सुट्टी तब्बल ४० दिवस वाढवून घेतली. यासाठी त्याने ऑफिसमध्ये सांगितलं की, कशाप्रकारे त्याचे घटस्फोट झाले आणि नंतर लग्न झालं. (हे पण वाचा ; बोंबला! घर घेण्यासाठी त्याने खर्च केले तब्बल ४ कोटी रूपये अन् मिळालं अर्धच घर!)

मजेदार बाब ही आहे की, खोटं सांगत त्याने ज्या लग्नांचा आणि घटस्फोटांचा उल्लेख केला ते त्याने एकाच तरूणीसोबत केले. नंतर बॅंकेने माहिती मिळवली तेव्हा याचा खुलासा झाला. नंतर बॅंकेने पेड लीव देण्यास नकार दिला आणि प्रकरण कोर्टात गेलं. या व्यक्तीने कोर्टात बॅके विरोधात केस दाखल केली. तर बॅंकेने सांगितले की, या व्यक्तीने नियम तोडले आहेत. 
 

Web Title: Taiwan man 4 times married 3 times divorced with same girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.