कुतुबमिनार आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच झाड; वर्षाला देते 700 KG ऑक्सिजन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 05:55 PM2023-07-04T17:55:41+5:302023-07-04T17:55:54+5:30
या झाडाचा शोध एका जोडप्याने 2006 मध्ये लालला होता. हे झाड वर्षभरात 20 टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेते.
तुम्ही आतापर्यंत अनेक उंच झाडं पाहिली असतील, पण कुतुबमिनारपेक्षा उंच झाड कधी पाहिलं आहे का? तुम्हाला वाटेल इतकं उंच झाड वाढू शकत नाही. पण, जगात एक असे झाड आहे, ज्याची उंची 115.85 मीटर आहे. म्हणजेच या झाडासमोर भारतातील कुतुबमिनार आणि अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी लहान दिसतील.
जगातील सर्वात उंच झाडाचे नाव हायपेरियन आहे. 2006 मध्ये याचा शोध लागला. एका जोडप्याने हे झाड शोधले होते. या झाडाचे नाव ग्रीक पौराणिक कथेवरून घेतले आहे. 115.85 मीटर उंचीमुळे या झाडाच्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. हे जगातील सर्वात उंच झाड मानले जाते. हे कॅलिफोर्नियाच्या नॅशनल पार्कमध्ये असून, अतिशय दूर वरुनही दिसते.
मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल पार्कमध्ये जाणाऱ्या लोकांना या झाडाजवळ जाण्यास मनाई आहे. या झाडाजवळ कोणी गेल्यास त्याला 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते. यासोबतच त्याला 4 लाख रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो.
या झाडाची खासियत काय आहे?
या झाडाची एक खासियत आहे, ती म्हणजे हे झाड एका वर्षात 700 किलो ऑक्सिजन देते. एवढेच नाही तर वर्षभरात हे झाड सुमारे 20 टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. याशिवाय हे झाड 20 किलो धूळही शोषून घेते. या झाडाखाली उन्हाळ्यातही तापमान 4 अंशांपर्यंत घसरते. झाड एका वर्षात सुमारे 1 लाख चौरस मीटर परिसरातील घाण हवा फिल्टर करते.