आयफोन, हेलिकॉप्टर, कार, रोबोट देणार; चंद्रावरही नेणार; अपक्ष उमेदवाराचा जाहीरनामा पाहून मतदार 'उडाले'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:40 PM2021-03-25T15:40:05+5:302021-03-25T15:42:19+5:30
Tamil Nadu Assembly Election 2021: अपक्ष आमदाराकडून आश्वासनांची खैरात; प्रत्येक घरातील तरुणाला एक कोटी मिळणार
चेन्नई: तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीचा (Tamil Nadu Assembly Election 2021) धुरळा उडाला आहे. ६ एप्रिलपासून राज्यात मतदानाला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यांना विविध आश्वासनं देत आहेत. मात्र एका अपक्ष आमदाराच्या जाहीरनाम्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
याला म्हणतात नशीब! फक्त १६३ रूपयांचं जेवण घेऊन ती घरी आली; अन् मिळाला १ कोटीचा मोती
दक्षिण मदुराई मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ३४ वर्षीय सरावनान यांनी मतदारांना अनेक आश्वासनं दिली आहेत. सरावनान यांनी दिलेली एकापेक्षा एक भन्नाट आश्वासनं पाहून मतदारदेखील 'उडाले' आहेत. निवडून आल्यास आयफोन, कार, हेलिकॉप्टर, रोबोट आणि बरंच काही देऊन अशी आश्वासनं त्यांनी दिली आहेत. त्यामुळे सरावनान यांचा जाहीरनामा सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.
असाही आजार! आकर्षक पुरूष दिसला की लगेच डगमगते ही महिला, रस्त्याने खाली मान घालून चालणं भाग!
मी निवडून आल्यास प्रत्येक घरामागे एक आयफोन, कार, हेलिकॉप्टर, रोबोट देईन. मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला स्विमिंग पूलसह तीन मजली घर, तरुणांना एक कोटी रुपये देईन. याशिवाय चंद्रांवर १०० दिवस सहलीला घेऊन जाईन, अशी आश्वासनं सरावनान यांनी दिली आहेत. मतदारांसोबतच मतदारसंघासाठीही त्यांनी मोठमोठी आश्वासनं दिली आहेत. मतदारसंघात अंतराळ संशोधन केंद्र, रॉकेट लॉन्चिंग साईट आणि ३०० फुटांचा कृत्रिम हिमनग उभारण्यात येईल, अशी घोषणादेखील सरावनान यांनी केली.
Madurai South makkaley... Bonanza awaits you. This guy is promising ₹ 1 crore in your account (not jujubi ₹ 15 lakh). pic.twitter.com/L4KnEH2lx6
— RadhakrishnanRK (@RKRadhakrishn) March 24, 2021
लोकांच्या मनात जागरुकता निर्माण व्हावी, तरुणांचा राजकारणातील सहभाग वाढावा यासाठी निवडणूक लढवत असल्याचं सरावनान यांनी सांगितलं. निवडणूक कशी लढवायची असते याची अनेकांना कल्पना नसते. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठीच मी निवडणूक लढवत आहे, अशा शब्दांत सरावनान यांनी त्यांचा उद्देश सांगितला. निवडणूक, मतदान याबद्दल जनजागृती झाल्यास त्याचा लाभ समाजाला होईल. राजकीय नेत्यांवर लोकांचा वचक राहील, असं सरावनान म्हणाले.