बाबो! माशांऐवजी जाळ्यात 'जे' अडकलं ते पाहून हैराण झाले मच्छिमार, 230 कोटी रूपये आहे याची किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 03:09 PM2020-06-22T15:09:11+5:302020-06-22T15:17:06+5:30
जेव्हा त्यांनी जाळं बाहेर काढलं तेव्हा त्यात जे दिसलं ते पाहून हैराण झाले. त्या त्यांना हिरव्या रंगाचे खूपसारे पॅकेट्स होते. ज्यांवर चीनी आणि इंग्रजी भाषेत काहीतरी लिहिलेले होते.
(Image Credit : aajtak.intoday.in)
तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील मामल्लपुरम येथील समुद्रात मासेमारीसाठी मच्छीमार गेले होते. मासे पकडण्यासाठी त्यांनी नेहमीप्रमाणे जाळं फेकलं. काही वेळाने त्यांना जाळं जड वाटलं. त्यांना वाटलं की, भारी मासा अडकलाय. पण जेव्हा त्यांनी जाळं बाहेर काढलं तेव्हा त्यात जे दिसलं ते पाहून हैराण झाले. त्या त्यांना हिरव्या रंगाचे खूपसारे पॅकेट्स होते. ज्यांवर चीनी आणि इंग्रजी भाषेत काहीतरी लिहिलेले होते.
मच्छिमारांनी त्यांनी ते पॅकेट्स किनाऱ्यावर आणून चेक केले तर त्यांना समजलं की, हे चीनी चहाचे पॅकेट्स आहेत. त्यांना या पॅकेट्सच्या आत मेथाफेटामाइन सापडलं. हे एकप्रकारचं ड्रग आहे. याला क्रिस्टर मेथ असंही म्हणतात. यात साधारण 78 किलो ग्रॅंम क्रिस्टल मेथ सापडलं. ज्याची किंमत बाजारात तब्बल 230 कोटी रूपये इतकी आहे. मच्छिमारांनी लगेच हे ड्रग पोलिसांच्या ताब्यात दिलं.
ज्या पॅकेट्समध्ये ड्रग सापडलं ते चीनी चहाचे पॅकेट्स आहेत. तामिळनाडूच्या नार्कोटिक्स इंटेलिजन्स ब्यूरो क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे फार हाय व्हॅल्यू असलेलं ड्रग आहे. या ड्रगची एक किलोची किंमत 3 कोटींपेक्षा अधिक आहे.
पोलिसांनी शंका आहे की, हे ड्रग्स श्रीलंके मार्गे मलेशियाला जाणार होतं. या ड्रग्सला मेथ, ब्लू, आइस आणि क्रिस्टल अशी वेगवेगळी नावे आहेत. याचा वापर जास्तीत जास्त रेव पार्ट्यांमध्ये केला जातो. या ड्रगमुळे शरीराच्या नर्वस सिस्टीमवर फार वाईट परिणाम होतो.
जर या ड्रगसोबत कुणी पकडलं गेलं तर त्याला जास्तीत जास्त 20 वर्षांचा तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. इतकेच नाही तर 2 लाखांपर्यंत दंडही भरावा लागू शकतो. पुन्हा हा गुन्हा केला तर मृत्यूदंडाचीही शिक्षा होऊ शकते. काही आठवड्यांपूर्वीच तामिळनाडूच्या रामनाथपुरममध्ये पोलिसांनी 11.4 किलोग्रॅम ड्रग्स आणि 1.5 टन रेड सॅंडर्स पकडले होते. हा मालही श्रीलंका जाणार होता.
कोल्ड ड्रिंकच्या बॉटलमध्ये कंडोम आणि जलजीऱ्याचं पाकीट, ग्राहकासह दुकानदारही हैराण....