बोंबला! झोपलेल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर पत्नीने ओतलं उकळतं पाणी आणि मग...जाणून घ्या कारण..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 01:54 PM2022-08-18T13:54:42+5:302022-08-18T13:56:40+5:30
Crime News : इथे एका पत्नीने पती गाढ झोपेत असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवर उकळतं पाणी टाकलं. तामिळनाडूच्या (Tamil Nadu) रानीपत (Ranipat District) जिल्ह्यातली ही घटना आहे.
पती-पत्नीच्या भांडणांच्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. कधी पती पत्नीची हत्या करतो किंवा पत्नी तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करते. पण तामिळनाडूमधून एक फारच विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका पत्नीने रागाच्या भरात पतीसोबत असं काही केलं ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तिने जे केलं ते वाचाल तर तुमचं डोकं चक्रावून जाल.
इथे एका पत्नीने पती गाढ झोपेत असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवर उकळतं पाणी टाकलं. तामिळनाडूच्या (Tamil Nadu) रानीपत (Ranipat District) जिल्ह्यातली ही घटना आहे. 29 वर्षीय तरूण पत्नीनं आपल्या पतीसोबत केलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडालीय. पत्नीच्या धक्कादायक कृत्यानंतर पती गंभीर जखमी झाला आहे. त्याचा प्रायव्हेट पार्ट 50 टक्के भाजला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी आता पत्नीवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पत्नीनं असं का केलं, याचं कारणही समोर आलं आहे. आरोपी पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस तिची चौकशी करत आहेत.
असं करण्याचं कारण
पतीचं बाहेर काहीतरी लफडं सुरू आहे याचा संशय टी प्रिया या 29 वर्षीय विवाहीत तरुणीला आला होता. याच संशयातून प्रियाने एल थांगराज या 32 वर्षीय पतीवर राग काढायचं ठरवलं. संतापलेल्या प्रियाने एका रात्री थांगराज घरी झोपलेला असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवरच उकळतं पाणी टाकलं. या दाम्पत्यासोबतची ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
हे कृत्य केल्यानंतर पतीचा प्रायव्हेट पार्ट गंभीर झाला. पतीचा प्रायव्हेट पार्ट 50 टक्के भाजलाय. त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यानंतर त्याची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने त्याला अधिक उपचारांसाठी दुसऱ्या एक बड्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं.
चौकशीतून समोर आलं की, या दाम्पत्याचं लग्न सात वर्ष आधी झालं होतं. या दाम्पत्याला एक लहान मुलगीही आहे. प्रियाला थांगराजवर गेल्या काही दिवसांपासून संशय आला होता. त्यातून त्यांच्या वादही झाले होते. शनिवारी जेव्हा थांगराज घरी परतला आणि खोलीत जाऊन झोपला होता. त्यावेळी प्रियाने बाथरुमच्या गिझरमधून पाणी गरम केलं, एका बादलीत भरलं आणि झोपी गेलेल्या आपल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवरच ओतलं होतं.