वाह रे नशीब! खाणीत काम करताना सापडली दोन किंमती अन् मोठी रत्ने, मजूर रातोरात झाला कोट्याधीश...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 03:31 PM2020-06-25T15:31:17+5:302020-06-25T15:38:28+5:30

गर्द जांभळ्या रंगाची ही रत्ने Saniniu Laizer नावाच्या व्यक्तीला सापडली आहेत. हे त्याला उत्तरेतील तंजानाइटच्या खाणीत सापडलेत.

Tanzania miner discovered two gems of worth about 27 crore | वाह रे नशीब! खाणीत काम करताना सापडली दोन किंमती अन् मोठी रत्ने, मजूर रातोरात झाला कोट्याधीश...

वाह रे नशीब! खाणीत काम करताना सापडली दोन किंमती अन् मोठी रत्ने, मजूर रातोरात झाला कोट्याधीश...

Next

कुणाचं नशीब चमकावं तर या माणसासारखं....तंजानियातील एका मायनरला म्हणजे खदानीत काम करणाऱ्याचा जॅकपॉट लागलाय. या व्यक्तीला सरकारने 7.74 बिलियन तंजानिया शिलिंग म्हणजे 3.35 बिलियन डॉलर म्हणजेच साधारण 25 कोटी 36 लाख रूपयांचा चेक दिलाय. 

झालं असं की, या व्यक्तीला खोदकाम करताना दोन भारी अनमोल रत्ने मिळालीत. या रत्नांच्या बदल्यात त्याला सरकारने इतकी मोठी रक्कम दिली. आता या व्यक्तीला इतकी मोठी रक्कम दिली तर या रत्नांची किंमत किती असेल याचा अंदाज लावा.

गर्द जांभळ्या रंगाची ही रत्ने Saniniu Laizer नावाच्या व्यक्तीला सापडली आहेत. हे त्याला उत्तरेतील तंजानाइटच्या खाणीत सापडलेत. तंजानिया खाण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आधी सापडलेल्या रत्नाचं वजन 9.27 किलोग्रॅम इतक तर आणि दुसऱ्या रत्नाचं वजन 5.103 किलोग्रॅम इतकं आहे. म्हणजे दोन्ही रत्नांचं वजन 15 किलोपेक्षा अधिक आहे.

तंजानाइट रत्न केवळ या पूर्व आफ्रिकन राष्ट्राच्या एका छोट्या उत्तरेतील भागातच सापडतात. ही रत्ने तंजानियातील बॅंकेने खरेदी केले आहेत. ज्याला ही रत्ने सापडली त्या Saniniu ला चेक देताना कार्यंक्रमाचं टीव्हीवर लाइव्ह करण्यात आलं. इतकेच नाही तर देशाचे राष्ट्रपती John Magufuli यांनी Saniniu फोन करून शुभेच्छाही दिल्या. आता यावरून विचार करा की, या रत्नांची किंमत किती असेल.

बम बम भोले! नदी किनारी वाळूमध्ये सुरू होतो खोदकाम, शेकडो वर्ष जुनं शिव मंदिर सापडलं...

बोंबला! 'इथे' लग्नात जावयाला हुंडा म्हणून दिले जातात 21 विषारी साप, त्याशिवाय होतंच नाही लग्न!

लॉकडाऊनमध्ये मालामाल झाल्या पॉर्न स्टार्स, कमाईची 'ही' आयडिया जगभरात ठरली सुपरहिट...

Web Title: Tanzania miner discovered two gems of worth about 27 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.