बाईकच्या मायलेजची खुप चर्चा करत असाल पण रेल्वे इंजिन किती मायलेज देते माहित आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 05:38 PM2021-12-23T17:38:33+5:302021-12-23T17:59:03+5:30

लंडनमधील कोर्टाने शेख मोहम्मद अल मकतूम यांना राजकुमारी हया बिंत अल-हुसेन यांच्या सुरक्षेसाठी आणि इतर बाबींसाठी तीन महिन्यांच्या आत २५१.५ मिलीयन पाउंड देण्याचे आदेश दिले आहेत.

तुम्हाला माहितीये का, या रेल्वे किती मायलेज देतात?  मायलेज जाणून घेण्यापूर्वी हेसुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं की, रेल्वेच्या इंधनाचा टँक किती क्षमतेचा असतो. | बाईकच्या मायलेजची खुप चर्चा करत असाल पण रेल्वे इंजिन किती मायलेज देते माहित आहे का?

बाईकच्या मायलेजची खुप चर्चा करत असाल पण रेल्वे इंजिन किती मायलेज देते माहित आहे का?

Next

भारतीय रेल्वे (Indian Railway) हे जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे जाळं आहे. प्रत्येक वर्गातील, स्तरातील व्यक्तीला रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा आहे. सध्या बरीच प्रगती झालेली असली, तरीही भारतीय रेल्वेचं इंजिन मुळात वीज, डीझेल आणि वाफेवर चालत आलं आहे. 

सध्या वाफेवर चालणारं इंजिन अगदी क्वचित प्रसंगीच रुळांवर येतं. पण, डिझेलवर चालणाऱ्या अनेक रेल्वे आहेत. तुम्हाला माहितीये का, या रेल्वे किती मायलेज देतात?  मायलेज जाणून घेण्यापूर्वी हेसुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं की, रेल्वेच्या इंधनाचा टँक किती क्षमतेचा असतो. 

तर, डिझेल इंजिनाच्या आधारे इंधनाच्या टाकीची तीन टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. ५ हजार लीटर, ५ हजार ५०० लीटर आणि ६ हजार लीटर अशा क्षमतेत या इंधन टाक्या आहेत. इंजिनाची सरासरी ही प्रतीकिलोमीटरच्या अंदाजानंच काढली जाते.  डिझेल इंजिन असणाऱ्या १२ डब्यांच्या पँसेंजर गाडीबाबत सांगावं तर, ही ट्रेन ६ लीटर प्रतिकिमी मायलेज देते.  तर, २४ डब्यांची एक्स्प्रेस रेल्वेगाडीसुद्धा ६ लीटर प्रतिकिमी इतकंच मायलेज देते. १२ डब्यांची एक्स्प्रेस रेल्वे ४.५० लीटर प्रतिकिमी इतकं मायलेज देते. 

पॅसेंजर आणि एक्स्प्रेसमध्ये फरक यासाठी असतो, कारण पँसेंजर रेल्वे ही सर्व स्थानकांवर थांबत जाते. परिणामी त्यामध्ये ब्रेक आणि अ‍ॅक्सिलेटरचा जास्त वापर केला जातो.  तुलनेने एक्स्प्रेस रेल्वेला कमी थांबे असतात. ज्यामुळं त्यामध्ये ब्रेक आणि अॅक्सिलेटरचा वापरही कमीच होतो.  मालगाडीबाबत सांगावं तर, डब्यांची संख्या आणि रेल्वेनं नेल्या जाणाऱ्या सामानाच्या आधारे मायलेज काढलं जातं.  ज्या मालगाडीवर सामानाचा भार जास्त आहे तिचं मायलेज हे कमीच असतं. 

Web Title: तुम्हाला माहितीये का, या रेल्वे किती मायलेज देतात?  मायलेज जाणून घेण्यापूर्वी हेसुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं की, रेल्वेच्या इंधनाचा टँक किती क्षमतेचा असतो.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.