महिला शिक्षिकेने क्लासरूममध्ये शूट केला अॅडल्ट व्हिडीओ, म्हणाली - पगार कमी असल्याने...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 11:34 AM2022-11-15T11:34:55+5:302022-11-15T11:35:30+5:30
America : असंही सांगण्यात आलं की, महिलेने हा व्हिडीओ एका अॅडल्ट साइडवर रिलीजही केला.
क्लासरूममध्ये पॉर्न शूट करण्याच्या आरोपाखाली एका महिला शिक्षिकेला नोकरीवरून काढण्यात आलं. हैराण करणारी बाब आहे की, शिक्षिका त्याच क्लासरूममध्ये व्हिडीओ शूट करत होती, जिथे ती शिकवत होती. असंही सांगण्यात आलं की, महिलेने हा व्हिडीओ एका अॅडल्ट साइडवर रिलीजही केला.
ही अमेरिकेच्या (America) अॅरिझोनामधील आहे. लेक हवासु सिटीच्या थंडरबोल्ट मीडल स्कूलमध्ये सामंथा पीर साइन्स शिकवत होती. तिने इन्स्टा पेजवर अॅडल्ट वेबसाइटची लिंकही शेअर केली होती. तिने हे अॅडल्ट प्रोफाइल वेगळ्या नावाने तयार केलं होतं. पण तिच्या या प्रोफाइलपर्यंत तिचे स्टुडंटही पोहोचले आणि त्यानंतर लवकरच शाळेत सगळं समजलं.
लेक हवासु यूनिफाइड स्कूलने पालकांना सांगितलं की, आम्हाला याबाबत माहिती मिळाली आहे की, विद्यार्थी एकमेकांसोबत काही आक्षेपार्ह गोष्टी शेअर करत आहेत. शाळेच्या वेळात ते फोटो घेतले गेलेले नव्हते. फोटोत दिसणाऱ्या महिलेला काढून टाकण्यात आलं आहे. आपल्या मुलांच्या फोनमधून ते फोटो डिलीट करा आणि त्यांना टेक्नॉलॉजी योग्यप्रकारे वापरण्यासाठी समजावून सांगा.
सामंथाचा पती डिलियन सुद्धा शिक्षक आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, तो सुद्धा अॅडल्ट व्हिडीओत काम करताना दिसला होता. त्यामुळे त्यालाही नोकरीहून काढण्यात आलं.
याबाबत सामंथाने एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं की, तिने आणि तिच्या पतीने अॅडल्ट व्हिडीओ बनवणे सुरू केले कारण शिक्षकांना फार कमी पगार असतो. यातून त्यांचा घर खर्च भागत नाही.
सामंथा म्हणाली की, तिने तिच्या अॅडल्ट पेजमध्ये पूर्ण राज्याला ब्लॉक केलं होतं. पण नंतर तिचा क्लासरूम व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर शाळेत अॅडल्ट अकाउंटबाबत तिला विचारपूस करण्यात आली. यानंतर तिने काही दिवस सुट्टी घेतली. सामंथाने दावा केला आहे की, नंतर दबावात येऊन तिने राजीनामा दिला. तर सामंथाच्या पतीला 2 नोव्हेंबरला नोकरीवरून काढण्यात आलं.