यापुढे कांदा नाही रडवणार! कारण 'हा' नव्या प्रकारचा कांदा कापताना डोळ्यांतून पाणी येणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 06:01 PM2022-01-13T18:01:14+5:302022-01-13T18:06:08+5:30
कांदा चिरणे (onion chopping) अनेकांना आवडत नाही. कारण कांदा चिरताना डोळ्यांची आग तर होतेच (Why tear come out while chopping onion), शिवाय डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागतात.मात्र असा कांदा आला आहे, जो चिरताना डोळ्यातून पाणी येणार नाही (Tearless onion).
स्वयंपाकात (cooking) अगदी महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा (onion). विविध भाज्या बनवताना कांद्याशिवाय चवच येत नाही. सलाडमध्येही (salad) कांद्याचा वापर केला जातो. हॉटेलमध्ये जेवणाचे ताट (dinner plate in a hotel) घेतले तर ते कांद्याशिवाय पूर्णच होत नाही. कांदाभजीसारखे कांद्याचे पदार्थ बहुतांश जणांना आवडतात. पण कांदा चिरणे (onion chopping) अनेकांना आवडत नाही. कारण कांदा चिरताना डोळ्यांची आग तर होतेच (Why tear come out while chopping onion), शिवाय डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागतात.मात्र असा कांदा आला आहे, जो चिरताना डोळ्यातून पाणी येणार नाही (Tearless onion).
अमेरिकेत गोड कांदा पिकवण्यात आला आहे. १८ जानेवारीपासून यूकमध्ये या गोड कांद्याची विक्री सुरू होणार आहे. या कांद्याची विक्री सनियन्स (Sunions®) या ब्रँड नावाने वेट्रोज सुपर मार्केट स्टोर चेन करणार आहे. हा कांदा पिकवण्यासाठी तीन दशकांहून अधिक काळ लागल्याचे उत्पादकाने त्याच्या वेबसाइटवर म्हटलयं. त्यासाठी खूपच काळजीपूर्वक मशागत करण्यात आली. या कांद्याची त्याची चव इतर कांद्याच्या तुलनेत अळणी आहे. याचा वापर स्वयंपाकासोबत सॅलड म्हणूनही करता येतो, असे वेट्रोजचे मत आहे.
कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येतं?
२०१७ मध्ये कांदा चिरताना डोळ्यातून येणाऱ्या पाण्याबाबत एक अभ्यास करण्यात आला होता. त्यात असे समोर आले होते की, कांदा चिरताना डोळ्यांतून पाणी येण्याचे कारण म्हणजे तो चिरताना तयार होणारे सल्फोनिक अॅसिड. त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ सुद्धा होते. तसंच कांद्यामध्ये सीन प्रॉपेंशियल-एस-ऑक्साइड (Syn Propanethial S Oxide) नावाचं रसायन असतं. कांदा चिरल्यानंतर हे रसायन डोळ्यांमधल्या अश्रू ग्रंथीला उत्तेजित करतं आणि त्यामुळे डोळ्यांतून पाणी येतं.
डोळ्यातून पाणी न आणणाऱ्या कांद्यात काय आहे खास?
डोळ्यातून पाणी न आणणारा कांदा हा नवीन वाण विकसित करून तयार केलेला नाही. तर तो कांद्याच्या कमी तिखट वाणाच्या क्रॉस ब्रीडिंगमधून तयार करण्यात आला आहे. कांदा खरेदीदार पॉल बिडवेल यांनी ही माहिती दिली आहे. १८ जानेवारीपासून सनियन्स या ब्रँडने हा कांदा मिळणार असून त्याची वेट्रोजच्या निवडक स्टोअरमध्ये विक्री सुरू होईल. Waitrose.com येथे देखील हा लॉन्च केला जाईल, असं बिडवेल यांनी सांगितलं.