क्या बात! प्रोटेस्टनंतर 10 तास उचलत राहिला 'तो' रस्त्यावरील कचरा, खूश होऊन एकाने गिफ्ट दिली कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 12:16 PM2020-06-08T12:16:33+5:302020-06-08T12:30:03+5:30

एंटोनियोने न्यूयॉर्कमध्ये सकाळी 2 वाजेपासून दिवसाचे 12 वाजेपर्यंत प्रोटेस्टदरम्यान रस्त्यावर पडलेले कागद, प्लास्टिक उचलले.

Teen who spent 10 hours cleaning up after protest rewarded with car and college scholarship | क्या बात! प्रोटेस्टनंतर 10 तास उचलत राहिला 'तो' रस्त्यावरील कचरा, खूश होऊन एकाने गिफ्ट दिली कार!

क्या बात! प्रोटेस्टनंतर 10 तास उचलत राहिला 'तो' रस्त्यावरील कचरा, खूश होऊन एकाने गिफ्ट दिली कार!

Next

अमेरिकेत सध्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्युनंतर जोरदार आंदोलने होत आहेत. लोक हातांमध्ये बोर्ड, कागद आणि पोस्टर घेऊन विरोध दर्शवत आहेत. याच दरम्यान एका तरूणाने सर्वांचं मन जिंकणारं काम केलंय. रोज हजारो लोक प्रोटेस्टमध्ये सहभागी होतात आणि घरी जातात. पण तिथे सोडून जातात केवळ कचरा. हाच कचरा Antonio Gywn Jr नावाच्या तरूणाने प्रोटेस्टनंतर उचलला.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एंटोनियोने न्यूयॉर्कमध्ये सकाळी 2 वाजेपासून दिवसाचे 12 वाजेपर्यंत प्रोटेस्टदरम्यान रस्त्यावर पडलेले कागद, प्लास्टिक उचलले. जेव्हा दुसऱ्या दिवशी सफाई कामगार कचरा उचलण्यासाठी आले तेव्हा समोरचं चित्र पाहून हैराण झाले. त्यांना कळालं की, एंटोनियोने कचरा आधीच उचलला.

18 वर्षीय एंटोनियो सद्या हायस्कूलमध्ये आहे. त्याने सीएनएनला सांगितले की, त्यांने न्यूजमधे पाहिलं होतं की, काही ठिकाणे कचरा आणि ग्लासने पूर्णपणे भरले आहेत. त्याला हे माहीत होतं की, लोकांना सकाळी उठून त्यांच्या कामावर जायचं आहे. त्यामुळे त्याने स्वत:च कचरा साफ केला.

एंटोनियोने केलेल्या कामाची माहिती जेव्हा मॅट ब्लॉक नावाच्या व्यक्तीला मिळाली तेव्हा त्याने एंटोनियोला एक कार गिफ्ट केली. त्याने 2004 मॉडल Mustang convertible कार गिफ्ट केली. एंटोनियोने सांगितले की, त्याच्या आईकडे अशीच कार होती. 2018 मध्ये तिचं निधन झालं. इतकंच नाही तर शहरातील एका बिझनेसमनने त्याच्याकडून या कारचा ऑटो इन्शुरन्सही वाढवला आहे.

Medaille College, Buffalo ने त्यांच्याकडून एंटोनियोला फ्री स्कॉलरशिप सुद्धा दिली आहे. एंटोनियो बिझनेसच्या शिक्षणासाठी पैसे जमा करत होता. अशात कॉलेजकडून त्याला स्कॉलरशिप मिळाली. आता कमी खर्चात त्याचं शिक्षण पूर्ण होणार आहे.

Web Title: Teen who spent 10 hours cleaning up after protest rewarded with car and college scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.