अरे देवा! विमानाखालील लॅंडींग गिअरला चिकटून होता मुलगा, १९ हजार फूट उंचीवर प्रवास करूनही सुखरूप...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 02:54 PM2021-02-06T14:54:40+5:302021-02-06T14:55:41+5:30

हा मुलगा तुर्की एअरलाइन्सच्या कार्गो फ्लाइटच्या लॅंडींग गिअरला चिकटला होता. एक दिवसांआधीच ही फ्लाइट केनियाहून इस्तांबुल मार्गे लंडनला पोहोचली होती.

Teenage clings landing gear survives London to Holland flight | अरे देवा! विमानाखालील लॅंडींग गिअरला चिकटून होता मुलगा, १९ हजार फूट उंचीवर प्रवास करूनही सुखरूप...

अरे देवा! विमानाखालील लॅंडींग गिअरला चिकटून होता मुलगा, १९ हजार फूट उंचीवर प्रवास करूनही सुखरूप...

Next

विमानाच्या खालच्या भागात लॅंडींग गिअरला चिकटून १६ वर्षीय मुलाने प्रवास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लंडनहून उड्डाण घेतल्यानंतर जेव्हा फ्लाइट नेदरलॅंडच्या होलॅंड पोहोचली तेव्हा स्टाफला लॅंडींग गिअरजवळ एका मुलगा असल्याचं दिसलं.

साधारण १९ हजार फूट उंचीवर फार जास्त थंड वातावरण असल्याने या मुलाला हायपोथर्मिया झाला आहे. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. DutchNews.nl च्या रिपोर्टनुसार, या मुलाने लॅंडींग गिअरला चिकटून साधारण ५१० किलोमीटरचा प्रवास केला. होलॅंडच्या मास्ट्रिच्ट एअरपोर्टवर फ्लाइट लॅंड केल्यावर त्याला उतरवण्यात आलं. (हे पण वाचा : मॉडलचे कपडे पाहून कॅबिन क्रू ने दिलं जॅकेट, नंतर एअरलाइन्सने मागितली माफी....)

असे सांगितले जात आहे की, हा मुलगा तुर्की एअरलाइन्सच्या कार्गो फ्लाइटच्या लॅंडींग गिअरला चिकटला होता. एक दिवसांआधीच ही फ्लाइट केनियाहून इस्तांबुल मार्गे लंडनला पोहोचली होती. ही घटना समोर आल्यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते याचा तपास घेतील की, हा प्रकार मानव तस्करीचा तर नाहीये ना. (हे पण वाचा : बाबो! 'या' रॅपरने कपाळावर लावला १७५ कोटी रूपयांचा हिरा, लोक म्हणाले - 'देवाने तुझं डोकं वाचवावं')

मास्ट्रिच्ट एअरपोर्टच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, मुलगा फारच भाग्यशाली आहे की, अशाप्रकारे प्रवास करूनही तो जिवंत आहे. याआधी अशाप्रकारे काही लोकांनी लॅंडींग गिअरला चिकटून प्रवास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण जास्तीत जास्त वेळ लोकांना आपला जीव गमवावा लागला.
 

Web Title: Teenage clings landing gear survives London to Holland flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.