अरेरे! रोज बॉयफ्रेंडला 100 वेळा करायची फोन; कारण समजताच पायाखालची जमीन सरकली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 03:04 PM2024-04-24T15:04:13+5:302024-04-24T15:16:43+5:30
गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड अनेकदा एकमेकांना कॉल करतात आणि दिवसभराचे अपडेट्स घेतात. पण कधी कधी दोघांपैकी एक जोडीदार इतका पझेसिव्ह होतो किंवा त्याला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडशी बोलण्याची इतकी सवय असते की तो दिवसभर फोन करत राहतो.
गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड अनेकदा एकमेकांना कॉल करतात आणि दिवसभराचे अपडेट्स घेतात. पण कधी कधी दोघांपैकी एक जोडीदार इतका पझेसिव्ह होतो किंवा त्याला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडशी बोलण्याची इतकी सवय असते की तो दिवसभर फोन करत राहतो. एका मुलीशी संबंधित असेच एक प्रकरण समोर आले आहे जे हैराण करणारे आहे.
दक्षिण-पश्चिम चीनमधील सिचुआन प्रांतातील 18 वर्षीय Xiaoyu दिवसातून 100 पेक्षा जास्त वेळा तिच्या बॉयफ्रेंडला फोन करत असे. Ueniyu न्यूजच्या वृत्तानुसार, तिच्या या सवयीमुळे तिचे मानसिक आरोग्य आणि तिच्या बॉयफ्रेंडचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते.
चेंग्दू के द फोर्थ पीपल्स हॉस्पिटलमधील डॉक्टर डू ना यांनी सांगितलं की, Xiaoyu चं असं वागणं कॉलेजमध्येच सुरू झालं. Xiaoyu आणि तिच्या बॉयफ्रेंडचे प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर, त्याला अस्वस्थ वाटू लागले. कारण Xiaoyu प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यावर खूप अवलंबून होती. तिला सतत त्याची गरज होती. तिला नेहमी त्याचं लोकेशन जाणून घ्यायचं होतं आणि प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर हवं होतं.
एके दिवशी तिने बॉयफ्रेंडला 100 हून अधिक वेळा फोन केला पण त्याने उत्तर दिले नाही. यामुळे ती इतकी संतप्त झाली की तिने घरातील सामान फेकण्यास आणि तोडण्यास सुरुवात केली. तिने फोनवर बाल्कनीतून उडी मारण्याची धमकी दिल्यावर तिच्या बॉयफ्रेंडने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिला रुग्णालयात नेलं. तेव्हा तिला बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डरचं निदान झालं, ज्याला 'लव्ह ब्रेन' म्हटलं जातं.
डॉक्टर म्हणाले की, ही स्थिती एंजाइटी, बाय पोलर डिसऑर्डर आणि डिप्रेशनसारख्या मानसिक आजारांसोबत देखील असू शकते. डॉक्टरांनी तिच्या आजाराचे कारण उघड केले नाही, परंतु असं म्हटलं आहे की, हे सहसा अशा लोकांमध्ये होतं ज्यांचे लहानपणी आपल्या पालकांशी चांगले संबंध नव्हते.