लय भारी! शेतकऱ्याची आई-वडिलांना अनोखी श्रद्धांजली; थेट शेतातच हुबेहुब प्रतिमा साकारली 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 11:51 AM2022-09-14T11:51:24+5:302022-09-14T11:53:48+5:30

केवळ आकाशातून किंवा ड्रोनच्या लेन्समधून दिसेल असं आपल्या आई-वडिलांचं चित्र शेतकऱ्याने हटके रुपात तयार केलं आहे.

telangana farmer pays unique tribute to parents picture engraved in the paddy field | लय भारी! शेतकऱ्याची आई-वडिलांना अनोखी श्रद्धांजली; थेट शेतातच हुबेहुब प्रतिमा साकारली 

फोटो - NBT

googlenewsNext

एका शेतकऱ्याने आपल्या आई-वडिलांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली, ते पाहून सगळेच त्याचं भरभरून कौतुक करत आहे. केवळ आकाशातून किंवा ड्रोनच्या लेन्समधून दिसेल असं आपल्या आई-वडिलांचं चित्र शेतकऱ्याने हटके रुपात तयार केलं आहे. तेलंगणाच्या निझामाबादपासून 35 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या गंगाराम चिन्नी क्रिष्णूडू यांनी शेतात आई वडिलांची सुंदर हुबेहुब प्रतिमा साकारली आहे. यासाठी क्रिष्णूडू यांनी तीन प्रकारच्या बियाणांचा वापर केला आहे.

माझे आई-वडील 21 वर्षांपूर्वी वारले. त्यांनी मला सहावीपर्यंत शिक्षण दिलं. शेतात त्यांची प्रतिमा साकारून मी त्यांचं स्मरण करत आहे. माझे पालक कसे होते ते मी जगाला दाखवत आहे, असं गंगाराम चिन्नी क्रिष्णूडू यांनी म्हटलं आहे. ड्रोनमधून शेतात साकारलेली आई-वडिलांची प्रतिमा अतिशय स्पष्टपणे दिसते. ते बनवण्यासाठी खूप मेहनत लागली. यासाठी मी एका चित्रकाराची नेमणूक केली आणि त्याला माझ्या आई-वडिलांचे चित्र दिले. मग त्याने रेषा तयार करण्यासाठी दोरखंड विकत घेतल्याचं देखील सांगितलं.

गंगाराम चिन्नी क्रिष्णूडू यांनी  यांनी तीन प्रकारच्या बियाणांचा वापर करून आई वडिलांचा फोटो साकारला. जसजशी झाडे वाढू लागली तसतसे पालकांचे चित्र स्पष्ट दिसू लागले. व्हिडिओ आणि ड्रोनच्या माध्यमातून त्यांनी या मैदानाचे फोटो काढले. चिन्नी कृष्णडू हे एक प्रगतीशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहे. बदलत्या काळाशी जुळवून घेण्यावर ते विश्वास ठेवतात. त्यांच्याकडे एक ग्रेन बँक आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: telangana farmer pays unique tribute to parents picture engraved in the paddy field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी