भारतातील अनोखं मंदिर जिथे केली जाते मांजरींची पूजा, मानतात देवीचा अवतार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 12:06 PM2022-10-10T12:06:53+5:302022-10-10T12:08:28+5:30

कर्नाटकात एक अनोखं मंदिर आहे जिथे मांजरींची पूजा केली जाते. असं मानलं जातं की, या मंदिरात गेल्या 1 हजार वर्षापासून मांजरींची पूजा केली जाते.

Temple in India where cat is worship for the last 1000 years | भारतातील अनोखं मंदिर जिथे केली जाते मांजरींची पूजा, मानतात देवीचा अवतार

भारतातील अनोखं मंदिर जिथे केली जाते मांजरींची पूजा, मानतात देवीचा अवतार

Next

Weird Temple In India : जेव्हा आपण रस्त्याने कुठे जात असतो आणि मांजर आडवी गेली तर अशुभ मानलं जातं. हिंदू धर्मात मांजरीला अशुभ मानलं जातं. मांजर आडवी गेली तर लोक थोडा वेळ तिथे उभे राहतात. पण कर्नाटकात एक अनोखं मंदिर आहे जिथे मांजरींची पूजा केली जाते. असं मानलं जातं की, या मंदिरात गेल्या 1 हजार वर्षापासून मांजरींची पूजा केली जाते.

मांजरीचं हे अनोखं मंदिर कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यापासून 30 किलोमीटर दूर बेक्कालेले गावात आहे. या गावाचं नाव कन्नडच्या बेक्कू शब्दावरून पडलं. ज्याचा अर्थ मांजर असा होतो. या गावातील लोक मांजरीला देवीचा अवतार मानतात. ते मांजरींची पूजा करतात. या गावातील लोक मांजरीला देवी मनगम्माचा अवतार मानतात.

मान्यतांनुसार, देवी मनगम्माने मांजरीचं रूप धारण करून गावात प्रवेश केला होता आणि वाईट शक्तींपासून गावाची सुरक्षा केली होती. तेव्हापासूनच या गावातील लोक मांजरींचं पूजा करतात. हे ऐकायला जरी अजब वाटत असलं तरी गावातील लोकांची मांजरींबाबत आस्था आहे. इथे मांजरींना अशुभ मानलं जात नाही.

कर्नाटकाच्या या गावातील लोक नेहमीच मांजरींची रक्षा करण्यावर विश्वास ठेवतात. असं सांगितलं जातं की, या गावात जर कुणी मांजरीला नुकसान पोहोचवलं तर त्यांना गावातून बाहेर काढलं जातं. सोबतच मांजर मेली तर तिला विधीवत दफन केलं जातं. 

Web Title: Temple in India where cat is worship for the last 1000 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.