तणावात आहात? मग करून पाहा या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 12:47 PM2017-10-12T12:47:56+5:302017-10-12T13:08:29+5:30

आपण मानसिक अनारोग्याच्या विळख्यात अधिक अडकत आहोत. कोणत्याही कारणाने आपल्यावर मानसिक स्थिंत्यतरं ओढावत असतात.

Tension? Then try these things | तणावात आहात? मग करून पाहा या गोष्टी

तणावात आहात? मग करून पाहा या गोष्टी

Next
ठळक मुद्देमित्रांशी बिनधास्त भांडा. मनातला राग शांत होईपर्यंत भांडा. समोरून काहीच उत्तर येणार नसलं तरी आपलं मन हलकं होत असतंतणावात असाल तर जुने रोमँटिक चॅट पुन्हा शोधून वाचू शकता.

धावपळीच्या युगात आपलं आपल्यावरंचं नियंत्रण हरवत चाललं आहे. त्यामुळेच आपण मानसिक अनारोग्याच्या विळख्यात अधिक अडकत आहोत. कोणत्याही कारणाने आपल्यावर मानसिक स्थिंत्यतरं ओढावत असतात. या तणावातून बाहेर पडण्यासाठी अनेक गोष्टींचा अवलंब करता येतो. योगा, बागेत चालणे, गप्पा मारणे यांव्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही तणावातून बाहेर येऊ शकता. या गोष्टी म्हणजे अगदीच तुमच्या आमच्या आवडत्या छंदाबद्दलही असू शकतात.

विनोदी चित्रपट पहा

सध्या अनेक विनोदी चित्रपट येतात. त्यातले काही अगदीच टुक्कार असतात. पण जुने विनोदी चित्रपट पाहून तुम्ही तुमचा तणाव नक्कीच दूर करू शकता. अगदी दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे इथपासून बॉलिवूडमधील शक्ती कपूर, जॉनी लिव्हर यांचे जुने चित्रपट पाहून तुम्ही तुमचा तणाव हलका करू शकता.

कार्टुन्स पहा

लहान मुलं कार्टुन्स पाहतात आणि मनमुराद  आनंद लुटतात. आपणही आपल्या बालपणी भरपूर कार्टुन्स पाहिले असतील. पण तुम्हाला माहितेय का कार्टुन्स पाहूनही आपला स्ट्रेस कमी होऊ शकतो. टॉम अॅण्ड जेरीच्या अनेक सिरीज आजही युट्यूबवर पहायला मिळतात. त्यामुळे प्रवासादरम्यानही तुम्ही या सिरीज पाहू शकता. कार्टुन बघणं फक्त लहान मुलांचंच काम आहे हा गैरसमज सोडून द्या. अजूनही कित्येक तरुण कार्टुन्सचा आनंद घेत असतात.

मित्रांशी भांडा

आपल्या आयुष्यात एखादा मित्र किंवा मैत्रिण अशी असते, जिच्यावर आपण हक्काने रागवू शकतो, अगदी विनाकारण. तुम्ही तणावात असाल आणि भांडणाची इच्छा असेल तर तुम्ही बिनधास्त त्यांच्याशी भांडा. मनातला राग शांत होईपर्यंत भांडा. मग ते भांडण कोणत्याही विषयावर असू शकतं. तुमचा राग शांत झाल्यावर तुमच्या भांडण्यामागचं कारण तुमच्या मित्राला सांगा नाहीतर तुमची मैत्री तुटू शकते. 

प्राण्यांशी गप्पा मारा

कधी कधी आपल्या मनातील गोष्टी आपण कोणासमोरच बोलू शकत नाही. त्यामुळे आपला तणाव वाढू शकतो. अशावेळेस आपल्याकडील पाळीव प्राण्यांशी गप्पा मारा. अगदी मित्र-मैत्रिणींप्रमाणे गप्पा मारा. समोरून काहीच उत्तर येणार नसलं तरी आपलं मन हलकं होत असतं, त्यामुळे काही प्रमाणात आपला तणावही हलका होतो.

इंटरनेटवरील सर्च हिस्ट्री चेक करा

तणावातून दूर राहण्यासाठी तुम्ही काय करता असा प्रश्न काहींना विचारला असता एकाने सांगितलं की  मी इंटरनेटवरील सर्च हिस्ट्री चेक करतो. त्यामुळे मी गेल्या काही दिवसात काय काय केलं याचा पत्ता लागतो. मग एखादी लिंक किंवा एखादी वेबसाईट मी का बरं सर्च केली असेल याचा विचार करत बसतो. यामुळे मी तणावाखाली आहे हेच विसरून गेलो असं त्याने सांगितलं. आहे की नाही गंमतीदार?

आवडत्या व्यक्तीचे जुने एसएमएस वाचा

व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या जमान्यात आपण आपल्या प्रियजनांच्या सतत संपर्कात असतो. त्यामुळे दिवसभरात आपल्या बऱ्याच गप्पा होतात. कधी कधी छान मुड असेल तर रोमॅटिंक गप्पाही रंगतात. त्यामुळे तुम्ही तणावात असाल तर जुने रोमँटिक चॅट पुन्हा शोधून वाचू शकता. त्यामुळे तुमच्या मनावरील ताण हलका होत जाईल.

हॉरर चित्रपट पहा

थरकाप उडवणारे चित्रपट तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही त्राण विसरण्यासाठी हॉरर चित्रपट पाहू शकता. हॉलिवूडमध्ये शिवाय बॉलिवूड आणि मराठीतही अनेक हॉरर चित्रपट येऊन गेले आहेत. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. 

चांगल्या आणि वाईट सवयी लिहा

आपल्यात अनेक चांगल्या वाईट सवयी असतात. त्यापैकी काही आपल्यालाही आवडत नाहीत. तरीही त्या काही आपली पाठ सोडत नाहीत. या चांगल्या वाईट सवयी कागदावर लिहा. यापैकी एखादी सवय आपल्या तणावाचं कारण तर नाही ना हे शोधून काढा. म्हणजे मग तणाव दूर करणं सोपं जाईल.

मोकळ्या जागेत जोरजोराने हसा

तणाव दूर करण्यासाठी काय करता येईल असं एका तरुणाला विचारल्यावर तो म्हणाला मोकळ्या जागेत जायचं आणि जेवढ्या मोठ्याने हसता येतंय तेवढ्या मोठ्याने हसायचं. खोटं खोटं हसून झाल्यावर आपल्याला आपल्या खोट्या आणि राक्षसी हसण्यावर हसायला येतं. त्यामुळे आपण खरं-खरं हसू लागतो. त्यामुळे आपण बराचश्या प्रमाणात ताणमुक्त राहू शकतो.

कपाट स्वच्छ करा

तणावातून बाहेर निघण्यासाठी आपली कपाटं स्वच्छ करा. त्यातून वापरात नसलेल्या वस्तू तात्काळ फेकून द्याव्या. उपयोगी वस्तू व्यवस्थित लावाव्यात. नव्या, चांगल्या आणि स्वच्छ वस्तू कपाटात भराव्यात. त्यामुळे आपल्याला जाणीव  होईल की आपण मनातही उगीचच नको त्या गोष्टी भरून ठेवलेल्या आहेत. या तणावामुळे आपण चांगल्या गोष्टी वाचणं आणि नव्या गोष्टी शिकणं विसरतो. त्यामुळे तणावापासून दूर राहयाचं असेल घरातील नको असलेल्या, वापरात नसलेल्या वस्तू बाहेर फेकायला शिका. त्याने ताजं-ताजं वाटतं. मनातील मळभ दूर होतं.

Web Title: Tension? Then try these things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.