कशी होते दिवस आणि रात्रीची विभागणी? स्पेसमधून दिसतो असा अद्भुत नजारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 09:22 AM2023-09-22T09:22:22+5:302023-09-22T09:26:31+5:30

Terminator line : आज आम्ही तुम्हाला एक अशी सीमा दाखवणार आहोत जी दिवस आणि रात्रीला विभागते. यात दिसतं की, दिवस आणि रात्रीची विभागणी पृथ्वीवर कशी होते.

Terminator line divides day night beautiful footage captured from space | कशी होते दिवस आणि रात्रीची विभागणी? स्पेसमधून दिसतो असा अद्भुत नजारा

कशी होते दिवस आणि रात्रीची विभागणी? स्पेसमधून दिसतो असा अद्भुत नजारा

googlenewsNext

Terminator line : दिवसामध्ये 24 तास असतात, ज्यात सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्रीचा समावेश असतो. आपल्यासाठी हे सामान्य असतं. जन्म झाल्यापासूनच आपण बदलत्या वेळेला बघत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, स्पेसमधून दिवस आणि रात्र कशी दिसते? आज आम्ही तुम्हाला एक अशी सीमा दाखवणार आहोत जी दिवस आणि रात्रीला विभागते. यात दिसतं की, दिवस आणि रात्रीची विभागणी पृथ्वीवर कशी होते.

पृथ्वीवर दिवस आणि रात्रीला विभागणाऱ्या लाइनला टर्मिनेटर म्हटलं जातं. स्पेसमध्ये ही लाइन कशी दिसते हे या फोटोत दाखवलं आहे. हा नजारा दाखवणारा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. टर्मिनेटर एक इमेजनरी लाइन असते जी पृथ्वीवर दिवस आणि रात्रीच्या बाउंड्री डिवाइड करते. ही लाइन सतत चालू लागते. पृथ्वीच्या रोटेशनच्या हिशोबाने ही लाइन फिरत असते. 

सोशल मीडियावर या टर्मिनेटर लाइनचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, कशी दिवस आणि रात्रीला विभागणारी एक लाइन दिवसभर इकडून तिकडे फिरत असते. ही लाइन रोटेट होणाऱ्या पृथ्वीसोबत फिरत असते. टर्मिनेटर लाइन फोटोग्राफर्स आणि एस्ट्रोनॉमर्सना खूप आवडते. कारण हा नजारा फार सुंदर असतो. 

इन्स्टावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओने लोकांना हैराण केलं आहे. बरेच लोक याला अद्भुत नजारा म्हणत आहेत. एका व्यक्तीने आपला अनुभव शेअर करताना सांगितलं की, त्याने या लाइनच्या वरून उड्डाण केलं होतं. प्लेनच्या एका बाजूला दिवस दिसतो आणि दुसऱ्या बाजूला रात्र. 

Web Title: Terminator line divides day night beautiful footage captured from space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.