एका अजब आजारामुळे डॉक्टरही झाले हैराण, उपचार करणंही होत आहे अवघड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 05:45 PM2023-04-03T17:45:28+5:302023-04-03T17:47:24+5:30

सीवर कर्मचाऱ्याला जाणवलं की, त्याच्यासोबत काहीतरी गडबड झाली आहे. त्यावेळी लूस मोशन आणि खाजेची समस्या झाली होती. तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याच्या त्वचेच्या आत कीडे हालचाल करत होते.

Terrible disease strange marks are being made at such places of the body difficult to treat | एका अजब आजारामुळे डॉक्टरही झाले हैराण, उपचार करणंही होत आहे अवघड

एका अजब आजारामुळे डॉक्टरही झाले हैराण, उपचार करणंही होत आहे अवघड

googlenewsNext

Terrible Disease: स्पेनमध्ये एक डॉक्टर एका 64 वर्षीय सीवर कर्मचाऱ्याच्या त्वचेच्या आत हालचाल करणारे राउंडवॉर्म लार्वा बघू शकत होते. या व्यक्तीला राउंडवॉर्मचा गंभीर आजार होता. एका रिसर्चनुसार, इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये माणसाच्या असामान्य "हाइपरिनफेक्शन" वर्णन केलं. रिपोर्टनुसार, सीवर कर्मचाऱ्याला जाणवलं की, त्याच्यासोबत काहीतरी गडबड झाली आहे. त्यावेळी लूस मोशन आणि खाजेची समस्या झाली होती. तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याच्या त्वचेच्या आत कीडे हालचाल करत होते.

ही व्यक्ती मॅड्रिडच्या यूनिवर्सिटीमध्ये गेला. तेव्हा डॉक्टरांच्या टीमला आढळलं की, व्यक्तीला स्ट्रॉन्गिलोइड्स स्टेरकोरेलिस आजार होता. ही एक परजीवी राउंडवॉर्मची  प्रजाति आहे. जी जगातल्या सगळ्यात उष्ण भागात आढळते. जेव्हा डॉक्टरांनी त्वचेच्या आत असलेल्या लार्वाच्या निशाणाचे स्केच केले, तेव्हा समजलं की, 24 तासांदरम्यान निशाण गेले. रिसर्चमध्ये देण्यात आलेल्या फोटोंवरून समजतं की, हे एका टॅटूसारखं दिसतं.

डॉक्टरांना असंही आढळून आलं की, सॅनिटेशन वर्करला संक्रमण कसं झालं. अनेक पर्यावरणीय परिस्थितींनी त्यांना परजीवी प्रति संवेदनशील बनवलं. तज्ञांनुसार, स्ट्रॉन्गिलोइड्स सामान्यपणे स्पर्शोन्मुख आहे आणि अनेक वर्ष चालू शकतो. त्यांचं मत आहे की, हा कीडा पाठीच्या मणक्याला नुकसान पोहोचवू शकतो. याने पाठ कमजोर होते.

रूग्ण एका संभावित जीवघेण्या स्थितीत गेला ज्याला हायपरिनफेक्शन म्हटलं जातं. ज्यात लार्वाचं प्रमाण वाढल्यावर सेप्सिस आणि ऑर्गन फेलिअर होऊ शकतं. राउंडवॉर्म शेवटी इतके खराब झाले की, ते त्याच्या त्वचेच्या आत सरपटू लागले. 

Web Title: Terrible disease strange marks are being made at such places of the body difficult to treat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.