सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 03:18 PM2024-05-15T15:18:25+5:302024-05-15T15:19:02+5:30
जाणून घ्या सूर्यावर स्फोट का होतो?
ISRO : काही महिन्यांपूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 यान पाठवले होते. आता याच आदित्य एल-1 आणि पूर्वी पाठवलेल्या चांद्रयान-2 ने सूर्याची काही भयंकर छायाचित्रे घेतली आहेत. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या फोटोंमध्ये सूर्यवर अतिशय मोठा स्फोट झाल्याचे दिसत आहे. या स्फोटाचा सौर वादळाच्या रुपात पृथ्वीवर परिणाम झाला. 2003 च्या भूचुंबकीय वादळानंतर सूर्यावरील हा स्फोट सर्वात भयंकर होता.
21 वर्षांनंतर असे वादळ आले
तब्बल 21 वर्षांनंतर आलेल्या या वादळाने शास्त्रज्ञांनाही हैराण केले आहे. इस्रो व्यतिरिक्त, NOAA स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरनेदेखील याची पुष्टी केली आहे. सूर्यावर आणखी स्फोट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. अशा प्रकारची सौर वादळे येत राहिल्यास पृथ्वीवरील दळणवळण यंत्रणा आणि जीपीएस यंत्रणेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
ISRO Captures the Signatures of the Recent Solar Eruptive Events from Earth, Sun-Earth L1 Point, and the Moonhttps://t.co/bZBCW9flT1pic.twitter.com/SaqGu5LjOV
— ISRO (@isro) May 14, 2024
सूर्यावर स्फोट का होतो?
सौर वादळ म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर होणारे स्फोट. ते ताशी कित्येक लाख किलोमीटर वेगाने वातावरणात पसरतात. अशी सौर वादळे अवकाशातील कण शोषून घेत पुढे सरकतात. जेव्हा ते पृथ्वीवर आदळतात, तेव्हा त्यांचा सॅटेलाईट नेटवर्क, टीव्ही, रेडिओ कम्युनिकेशन आणि जीपीएस प्रणालीवरही परिणाम होतो.