एक्स लवर्स अचानक समोर आले अन् झाले आउट ऑफ कंट्रोल, केलं असं काही की उडाली खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 11:48 AM2021-10-28T11:48:06+5:302021-10-28T11:49:12+5:30
Thailand : बऱ्याच वर्षांनी दोघे जेव्हा थायलॅंडमधील एका ऐतिहासिक स्थळावर एकमेकांसमोर आले तर दोघेही भावनांवर आवर घालू शकले नाहीत.
थायलॅंडमध्ये (Thailand) पूर्वाश्रमीचे प्रियकर-प्रेयसी (Ex-Lovers) जेव्हा भेटले तेव्हा त्यांच्या एकमेकांबद्दलच्या भावनांचा स्फोट झाला. या भावनांमध्ये वाहवत जात दोघांनी असं काही केलं की, धुमाकूळ झाला. दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आणि अटक केली. बऱ्याच वर्षांनी दोघे जेव्हा थायलॅंडमधील एका ऐतिहासिक स्थळावर एकमेकांसमोर आले तर दोघेही भावनांवर आवर घालू शकले नाहीत. त्यांनी सर्वांसमोर इंटीमेट रिलेशन बनवले. जे तिथे उपस्थित लोकांनी कॅमेरात कैद केलं.
‘डेली स्टार’ च्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी ४२ वर्षीय महिला सिरीरानी आणि तिचा ४८ वर्षीय एक्स-लवर्स चालरमला अटक केली आहे. दोघांना चियांग माई प्रांतात स्थित (Chiang Mai Province) एका ऐतिहासिक स्थळावर शारीरिक संबंध ठेवताना कॅमेरात कैद करण्यात आलं होतं. २२ ऑक्टोबरच्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लोक कपलवर टिका करत होते आणि त्यांच्या विरोधात त्यांना कारवाई हवी होती.
प्रियकराने दिलं अजब स्पष्टीकरण
पोलिसांनी सांगितलं की, कपलने ऐतिहासिक स्थळावर शरीरसंबंध ठेवल्याचं कबूल केलं. आरोपींनी सांगितलं की, दोघे आधी रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर वेगळे झाले. २२ ऑक्टोबरला जेव्हा दोघांचा सामना झाला, तेव्हा त्यांच्या भावना भरून आल्या. ते स्वत: जवळ येण्यापासून रोखू शकले नाही आणि सगळं काही विसरून संबंध ठेवू लागले. चालरमने पोलिसांना सांगितलं की, ते इमारतीच्या मागे संबंध ठेवत होते, त्यामुळे त्याला वाटलं त्यांना कुणी बघत नसेल.
वेगवेगळ्या शहरात राहतात दोघे
प्रियकराने स्थानिक लोकांची मागत सांगितलं की, 'ऐतिहासिक स्थळा अपमान करण्याचा माझा काहीच उद्देश नव्हता. मी चियांग माईच्या लोकांची माफी मागतो आणि आश्वासन देतो की, हे पुन्हा होणार नाही'. तेच पोलिसांनी सांगितलं की, महिला आणि पुरूष वेगवेगळ्या शहरात राहतात. दोघे काही वर्षाआधी वेगळे झाले होते.