हा राजा स्वत:ला मानतो भगवान रामाचा वंशज, संपत्ती इतकी आहे की वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 12:48 PM2022-06-13T12:48:45+5:302022-06-13T12:54:24+5:30

मीडिया रिपोर्ट्सनुसार, थायलॅंडचा राजा महा वाचिरालोंगकोन हा जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक मानला जातो. 2016 मध्ये वडील भूमिबोल आदूल्यादेजच्या मृत्यूनंतर त्याने गादी सांभाळली होती.

Thailand king Maha Vachiralongkon is considered the worlds richest king | हा राजा स्वत:ला मानतो भगवान रामाचा वंशज, संपत्ती इतकी आहे की वाचून चक्रावून जाल

हा राजा स्वत:ला मानतो भगवान रामाचा वंशज, संपत्ती इतकी आहे की वाचून चक्रावून जाल

Next

World's Richest King: जगात आजही असे अनेक देश आहेत जिथे राजांचं शासन चालतं. यात थायलॅंडपासून ते ब्रूनेई आणि मोरक्को या देशांचा समावेश आहे. हे देश तसे लहान आहेत, पण येथील राजांची नावं फोर मोठी आहेत. संपत्तीबाबत सांगायचं तर या राजांकडे लाखो-करोडो रूपयांची संपत्ती आहे. पण एक प्रश्न असाही उभा राहतो की, जगातील सर्वात श्रीमंत राजा कोण आहे?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, थायलॅंडचे राजा महा वाचिरालोंगकोन हे जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक मानले जातात. 2016 मध्ये वडील भूमिबोल आदूल्यादेजच्या मृत्यूनंतर त्यानी गादी सांभाळली होती. त्याच्या वडिलांनी साधारण 70 वर्षापर्यंत थायलॅंडवर राज्य केलं. सोबतच जगात सर्वात जास्त काळ गादीवर बसणारा राजा मानला जात होता.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, भूमिबोल आदूल्यादेजच्या अंत्यसंस्कारवेळी 50 किंवा 100 नाही तर 600 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. त्यांचा मृतदेह सोन्याने बनलेल्या रथातून स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आलं होतं. ते चकरी वंशातील नववे सम्राट मानले जातात. त्यामुळे त्यांना राम नवम असंही म्हटलं जातं. तेच राजा महा वाचिरालोंगकोन यालाही राम दशम म्हटलं जातं. कारण ते स्वत:ला रामाचे वंशज मानतात.

दरम्यान 2018 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या एका रिपोर्टनुसार, थायलॅंडचे सध्याचे राजा महा वाचिरालोंगकोनकडे 2 लाख कोटी रूपयांपेक्षा अधिकची संपत्ती आहे. ज्यात अब्जो रूपयांच्या शाही महालांसोबत 30 पेक्षा अधिक खाजगी विमान, वेगवेगळ्या लक्झरी गाड्या आणि हिऱ्यांचा समावेश आहे.

थायलॅंडचे राजा महा वाचिरालोंगकोन यांचं पर्सनल आयुष्य नेहमीच चर्चेत असतं. त्यांनी चार लग्ने केली. 2019 मध्ये त्यांनी 41 वर्षीय एका महिलेसोबत लग्न केलं. ती त्यांची चौथी पत्नी असून तिचं नाव सुतिदा तिजाई आहे. असं मानलं जातं की, ती राजाच्या मुख्य सुरक्षा टीमची उप प्रमुख होती. त्याआधी ती थाई एअरवेजमध्ये फ्लाइट अटेडंट म्हणून काम करत होती. राजाला आधीच्या तीन लग्नांमधून सात अपत्य आहेत.

ही बाब फार कमी लोकांना माहीत आहे की, राजा महा  वाचिरालोंगकोन हे एक ट्रेंड पायलट आहेत. त्यांना सगळ्या प्रकारची विमानं उडवता येतात. असं सांगितलं जातं की, जेव्हाही ते विदेश दौऱ्यावर जातात तेव्हा स्वत:  boeing 737 विमान उडवतात. 

Web Title: Thailand king Maha Vachiralongkon is considered the worlds richest king

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.