विमानाच्या बाथरूममध्ये महिलेचं दुखलं पोट, कॉकपिट सोडून धावत आला पायलट आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 10:48 AM2024-03-05T10:48:46+5:302024-03-05T10:49:18+5:30

18 वर्षापासून पायलट म्हणून करणारे जकारिन सारानराक्स्कुल यांना स्टाफने सांगितलं की, विमानाच्या बाथरूममध्ये एका महिलेला लेबर पेन होत आहे.

Thailand pilot leaves cockpit to help deliver baby during flight it was miracle kid | विमानाच्या बाथरूममध्ये महिलेचं दुखलं पोट, कॉकपिट सोडून धावत आला पायलट आणि मग...

विमानाच्या बाथरूममध्ये महिलेचं दुखलं पोट, कॉकपिट सोडून धावत आला पायलट आणि मग...

जगभरातून विमानात घडणाऱ्या अनेक घटना समोर येत असतात. ज्या हैराण करणाऱ्या असतात. तर कधी कधी चेहऱ्यावर स्माईल आणणाऱ्या असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. यात एक विमान तायवान ते बॅंकॉकसाठी उड्डाण घेत होतं. तेव्हाच एक इमरजन्सी आली. 18 वर्षापासून पायलट म्हणून करणारे जकारिन सारानराक्स्कुल यांना स्टाफने सांगितलं की, विमानाच्या बाथरूममध्ये एका महिलेला लेबर पेन होत आहे.

व्हायरल प्रेसनुसार, विमानाचे पायलट सारनराक्स्कुल हे ऐकताच महिला को-पायलटकडे जबाबदारी देऊन कॉकपिटच्या बाहेर आले. इतकंच नाही तर त्यांनी एखाद्या डॉक्टरांसारखी महिलेची डिलेव्हरी केली. त्यांनी व्हायरल प्रेसला सांगितलं की, त्यांनी आधी कुणाची डिलिव्हरी केली नव्हती. विमान जेव्हा बॅंकॉक, थायलॅंडमध्ये उतरलं तेव्हा पॅरोमेडिक्स महिलेची वाट बघत होते. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं. 

सारनराक्स्कुलने सांगितलं की, त्यांना अभिमान आहे की, ते एका बाळाला सुरक्षित या जगात आणू शकले. मला या गोष्टीचा आनंद आहे की, मी त्याला जगात आणण्यासाठी मदत करू शकलो. सारनराक्स्कुल यांनी सांगितलं की, त्याचं नाव क्रू ने त्याच नाव स्काय ठेवलं आहे.

2 वर्षाआधी अशीच एक घटना समोर आली होती. जिथे एका महिलेने 30 हजार फूट उंचीवर विमानात बाळाला जन्म दिला होता. डिलिव्हरी डेटच्या आधी महिलेला विमानात प्रवासादरम्यान अचानक लेबर पेन झालं होतं. ज्यानंतर स्टाफने तिची डिलिव्हरी केली. 

Web Title: Thailand pilot leaves cockpit to help deliver baby during flight it was miracle kid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.