भयंकर! पेनकिलरमुळे तरूणीच्या चेहऱ्याची झाली 'अशी' दशा, फोटो पाहून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 06:13 PM2020-06-05T18:13:30+5:302020-06-05T18:21:20+5:30
आजारी पडल्यानंतर दवाखान्यात न जाता पेनकिलर घेतात. याच पेनकिलरमुळे एका तरूणीसोबत धक्कादायक प्रकार घडलाआहे
काहीही शारीरिक समस्या उद्भवल्या की अनेकांना पेनकिलर घेण्याची सवय असते. नेहमी विविध माध्यमातून आपल्याला पेनकिलर जास्त घेणं चांगलं नसतं, त्यामुळे वेगवेगळे विकार उद्भवू शकतात. असं ऐकायची सवय असते. पण अनेकजण ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत आणि आजारी पडल्यानंतर दवाखान्यात न जाता पेनकिलर घेतात. याच पेनकिलरमुळे एका तरूणीसोबत धक्कादायक प्रकार घडलाआहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनिकिलर घेणं एका तरूणीच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. ही तरूणी थायलँडमधील आहे. इबुप्रोफेन या गोळ्या घेतल्यानंतर तिच्या शरीराची आग झाली आहे. त्वचेवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. योथिका कावेखम या महिलेने १९ मे रोजी सकाळी आणि दुपारी जेवणानंतर १ इबुप्रोफेन गोळी घेतली.
त्यानंतर तिच्या शरीराच्या आत जळजळ होऊ लागली. काही तासांतच तिची त्वचा पुळ्या आणि फोडांनी भरली. तिला असह्य वेदना होऊ लागल्या पतीने तीला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं. सात दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. आता तिची प्रकृती ठिक आहे.
योथिकाने माध्यामांना सांगितले की, "या घटनेनंतर मी गोष्ट शिकली ती म्हणजे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतंही औषध घेऊ नये. इतके दिवस उपचार आणि भयंकर वेदना सहन केल्यानंतर सल्लाशिवाय औषध घेणं किती धोकादायक ठरू शकतं, हे मला कळून चुकलं. मात्र माझं शरीर पूर्ण बरं होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आता मला आधीपेक्षा कमी वेदना होत आहेत"
थायलँडमधील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे उपसचिव डॉ. सुरचोक तांगिवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, "योथिकावर इबुप्रोफेनचा झालेला परिणाम खूपच धोकादायक होता. ती लकी आहे की, ड्रग अॅलर्जीमुळे तिच्या जीवावर बेतले नाही. पेनकिल स्टेरॉइड आणि पॅरासिटामोलच्या तुलनेत इब्रुप्रोफेनमुळे अॅलर्जीची शक्यता जास्त असते. काहीवेळा गंभीर प्रकरणात या अॅलर्जीमुळे मृत्यूचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतंही औषध घेणं अयोग्य ठरेल."
सलाम! ४०० दिवसात ८० हजारांपेक्षा जास्त झाडं लावली; जाणून घ्या 'या' वृक्षप्रेमीची कहाणी
संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी सुरू केली चक्क कोरोनाची पूजा, गंगास्नान करून दाखवला लाडवांचा नैवैद्य