2025 चा वाईट काळ अजून यायचाय...बाबा वेंगाचे भूकंपाचे भाकीत खरे ठरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 22:09 IST2025-04-02T22:07:37+5:302025-04-02T22:09:55+5:30

बाबा वेंगाची अनेक भाकीते खरी ठरली आहेत.

The bad times of 2025 are yet to come...Baba Venga's earthquake prediction came true | 2025 चा वाईट काळ अजून यायचाय...बाबा वेंगाचे भूकंपाचे भाकीत खरे ठरले

2025 चा वाईट काळ अजून यायचाय...बाबा वेंगाचे भूकंपाचे भाकीत खरे ठरले

बाबा वेंगाबद्दल बहुतांश लोकांना माहिती आहे. त्या बुल्गेरिया देशातील महिला भविष्यकार होत्या, ज्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी केलेली अनेक भाकिते आज खरी ठरताना पाहायला मिळतात. म्हणूनच लोक त्यांना या काळातील महान भविष्याकारांमध्ये गणले जाते. गेल्या काही वर्षांत त्यांची अनेक भाकीत खरी ठरली आहेत. त्यांनी 2025 बाबतदेखील काही भाकिते केली होती, जी खरी ठरली आहेत.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांनी 2025 या वर्षासाठी केलेली एक भविष्यवाणी गेल्या आठवड्यातच खरी ठरली. आम्ही म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपाबद्दल बोलत आहोत, ज्याबद्दल बाबा वेंगा यांनी अनेक वर्षांपूर्वी भाकीत केले होते. विशेष म्हणजे, त्यांनी अनेक वर्षांपूर्वी अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या खऱ्या ठरल्या. यात अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि चीनची वाढती शक्ती यांचा समावेश आहे. 

2025 मध्ये पुढे काय होणार?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाबा वेंगा यांनी या वर्षी भूकंपाचा अंदाजच व्यक्त केला नव्हता, तर 2025 मध्ये युरोपमध्ये मोठे युद्ध होण्याची शक्यता वर्तवली होती. सध्या जगातील परिस्थिती पाहून कुठे युद्ध पेटेल, काही सांगता येत नाही. याशिवाय या वर्षी मोठी महामारी उद्भवू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, लोकमत हे अंदाज बरोबर असल्याची पुष्टी करत नाही.
 

Web Title: The bad times of 2025 are yet to come...Baba Venga's earthquake prediction came true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.