‘हॅपी बर्थडे’च्या गाण्याची जन्मकथा, मोठा रंजक इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 01:56 PM2022-04-01T13:56:22+5:302022-04-01T13:57:42+5:30
वाढदिवसासाठी कुठला केक आणायचा, कोणता ड्रेस घालायचा, पार्टी कशी करायची, घरीच करुयात की, बाहेर जाऊयात या प्रश्नांची उत्तरं काहीही असू देत. केक कापताना मात्र जगभरातले लोक एकच गाणं गातात
हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर अमुक अमुक. हॅपी बर्थडे टू यू..
खरं सांगा, हे वाचतानाच मनातल्या मनात गायलात ना?, कारण हे गाणंच असं आहे की, तुम्ही जगात कुठेही असा, केक कापताना, वाढदिवस साजरा करत असताना हेच गाणं म्हणायचं असतं, हे आपल्याला पक्कं माहीत आहे. वाढदिवसाच्या केकसारखाच तो कापताना म्हटल्या जाणाऱ्या गाण्याचा इतिहासही मोठा रंजक आहे.
वाढदिवसासाठी कुठला केक आणायचा, कोणता ड्रेस घालायचा, पार्टी कशी करायची, घरीच करुयात की, बाहेर जाऊयात या प्रश्नांची उत्तरं काहीही असू देत. केक कापताना मात्र जगभरातले लोक एकच गाणं गातात. ते म्हणजे हॅपी बर्थडे टू यू ! हे गाणं तयार केलं मिल्ड्रेड आणि पॅटी हिल या बहिणींनी. या दोघी बहिणी शिक्षिका होत्या आणि एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी त्यांनी हे गाणं तयार केलं असं म्हणतात. लहान मुलांना सोप्या भाषेत शिकवता यावं हा त्यांचा प्रयत्न होता, मग त्यांनी लहान मुलांसाठी साधी सोपी गाणी लिहिली. त्यातलंच एक गाणं - गुड मॉर्निंग टू यू हे होतं. त्यातलं एक कडवं होतं, हॅपी बर्थडे टू यू. ते त्यांनी १८९३ साली तयार केलं असं म्हणतात. पुढे १९१२ साली हॅपी बर्थडे टू यू या नावाने ते गाणं आणि त्याची धून प्रसिद्ध झाली. पण, त्यावर हिल भगिनींचं नाव नव्हतं. १९२४ साली पहिल्यांदा त्यांच्या नावाने हे गाणं प्रसिद्ध झालं. ते इतकं लोकप्रिय झालं की, पुढे त्या गाण्याच्या बौद्धिक संपदा हक्कावरून (कॉपीराईट्स) वाद सुरू झाले. तोपर्यंत या गाण्याच्या कॉपी राईट्सची किंमत पाच दशलक्ष डॉलर्स झाली होती.
गंमत म्हणजे चक्क २०१५ म्हणजे अगदी आता आता पर्यंत हे गाणं सार्वजनिक माध्यमात म्हणण्यासाठी अमेरिकेत फी भरावी लागत होती. याला कारण अमेरिकेतले कडक कॉपीराईट कायदे. तोपर्यंत या गाण्यांवर हिल भगिनींचं नाव होतं, पण या हक्काला काही जणांनी कोर्टात आव्हान दिलं. त्यातल्या अनेक त्रुटी लक्षात आल्यानंतर न्यायालयाने हे गाणं वापरासाठी मुक्त केले. म्हणजे आपण वर्षांनुवर्षे पार्टीत हॅपी बर्थडे टू यू वाजवून अमेरिकन कायदा तोडत होतो तर...