स्टेजवर बसून होते नवरी-नवरदेव, प्रियकराने केलं असं काही मोडलं लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 01:34 PM2024-11-16T13:34:06+5:302024-11-16T13:34:45+5:30

अनेक तासांच्या हायव्होल्टेज ड्रामानंतर वरात नवरीला सोबत न घेताच परत गेली. आता मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली असून पुढील चौकशी सुरू आहे. 

The bride and groom were sitting on the stage, the marriage was broken because of lover! | स्टेजवर बसून होते नवरी-नवरदेव, प्रियकराने केलं असं काही मोडलं लग्न!

स्टेजवर बसून होते नवरी-नवरदेव, प्रियकराने केलं असं काही मोडलं लग्न!

उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये बुधवारी एका लग्नात फिल्मी स्टाईल वाद झाला आणि शेवटची लग्न मोडलं. सध्या या लग्नाची परिसरात चर्चा सुरू आहे. वाद इतका वाढला की, अनेक तासांच्या हायव्होल्टेज ड्रामानंतर वरात नवरीला सोबत न घेताच परत गेली. आता मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली असून पुढील चौकशी सुरू आहे. 

पीलीभीत जिल्ह्याच्या पूरनपूर गावातील ही घटना आहे. इथे बुधावारी एक लग्न सुरू होतं. नवरी आणि नवरदेवाला आशीर्वाद घेण्यासाठी स्टेजवर बसवलं होतं. स्टेजवर पाहुण्याचं जाणं-येणं सुरू होतं. अशात एक तरूण स्टेजवर आला आणि नवरीला गिफ्ट देऊ लागला. यावेळी तो नवरीसोबत काहीतरी बोलला. त्यामुळे नवरदेवाला गडबड असल्याचा संशय आला.

नवरदेवाने नवरीला मुलाबाबत विचारलं तर तिने सांगितलं की, तो तिच्या आत्याचा मुलगा आहे. वाद सुरू झालाच होता इतक्यात तरूणाचा एक मित्र गिफ्ट घेऊन स्टेजवर आला. वादा वाढला आणि नवरदेवाकडील लोकांनी दोन्ही तरूणांना स्टेजवर मारहाण केली. मारहाण होत असताना तरूणाच्या मित्राने दोघांच्या अनेक वर्षाच्या अफेअरचा खुलासा केला. अशात नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला. पंचायतमध्येही काही तोडगा निघाला नाही आणि नवरीच्या वडिलांना लग्न खर्चाची रक्कम परत दिल्यावर लग्न मोडण्यात आलं.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितलं की, लग्नादरम्यान दोन्ही पक्षात वाद झाला होता. मुलीच्या वडिलांनी दोन्ही तरूणांवर छेडछाड करण्याची तक्रार दाखल केली असून पुढील कारवाई केली जात आहे. 

Web Title: The bride and groom were sitting on the stage, the marriage was broken because of lover!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.