पहले मुर्गी की अंडा? अखेर कोडे सुटले! ब्रिटन, चीनच्या विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 10:03 AM2023-06-17T10:03:34+5:302023-06-17T10:09:41+5:30
अंडी, पिलांना जन्म देण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास
लंडन: जगात पहिले अंडे आले की कोंबडी, हा प्रश्न वर्षानुवर्षे लोकांना भेडसावत आहे. हे कोडे सोडवल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ब्रिटनच्या ब्रिस्टल आणि चीनच्या नानजिंग युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, अंडी नव्हे तर कोंबडा-कोंबडी पृथ्वीवर प्रथम आली. दीर्घ संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. हे संशोधन नेचर इकोलॉजी अँड इव्होल्यूशनमध्ये प्रकाशित झाले आहे.
संशोधन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, हजारो वर्षांपूर्वी कोंबडा-कोंबडी आजच्या सारखे नव्हते. त्या अंडी नव्हे तर पिलांना जन्म देत. मात्र यानंतर त्यांच्यामध्ये बदल झाला. पिले जन्माला घालणाऱ्या प्रजातींमध्येही अंडी घालण्याची क्षमता विकसित झाली. म्हणूनच हे स्पष्टपणे म्हणता येईल, प्रथम अंडे नव्हे तर कोंबडा आणि कोंबडी आली. लाखो वर्षांपूर्वी कोंबड्यांप्रमाणे डायनासोरदेखील अंडी घालत असत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. काही अंड्यांमध्ये आधीच गर्भ नसतो. पिलांना जन्म देण्याच्या क्षमतेतील फरक हा वेगवेगळा असणे हे विस्तारित गर्भधारणेमुळे होतो. पक्षी, मगरी आणि कासव अंडी घालतात, त्यांच्यामध्ये गर्भ अजिबात तयार होत नाही. तो नंतर तयार होतो.
अंडी, पिलांना जन्म देण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास
- संशोधनात, ५१ जीवाश्म आणि २९ सजीव प्रजातींचे अंडाशय (अंडी ग्रंथी) जीव म्हणून वर्गीकरण करण्यात आले.
- ब्रिस्टल विद्यापीठाचे प्रोफेसर मायकल बेंटन म्हणाले की, माशांच्या पंखांपासून हातपाय विकसित करणारे टेट्रापॉड मोठ्या प्रमाणात उभयचर होते.
- त्यांना अन्न, प्रजननासाठी पाण्यात किंवा त्यांच्या जवळ राहावे लागले.
असे काही जीव आहेत जे भ्रूणासह अंडी घालतात. सरडे आणि सापदेखील अंडी घालतात आणि पिलांना जन्म देऊ शकतात, कारण त्यांना उबवण्याची गरज नसते. -संशोधक