ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 08:49 PM2024-11-25T20:49:39+5:302024-11-25T20:50:45+5:30
...येथे कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव तर टाकला जातोच, शिवाय त्यांना किरकोळ कारणांमुळे नोकरीवरूनही काढून टाकले जाते. कधी कधी व्यवस्थापकांची वागणूक एवढी खराब असते की, कर्मचारी ते सहन करू शकत नाहीत.
जगातील सर्वात वाईट वर्क कल्चरसंदर्भात जेव्हा-जेव्हा बोलले जाते. तेव्हा-तेव्हा चीनचे नाव सर्वात पहिले समोर येते. येथे कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव तर टाकला जातोच, शिवाय त्यांना किरकोळ कारणांमुळे नोकरीवरूनही काढून टाकले जाते. कधी कधी व्यवस्थापकांची वागणूक एवढी खराब असते की, कर्मचारी ते सहन करू शकत नाहीत.
चीनमधून नुकतेच एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्याने लोकांना चकित करून टाकले आहे. ऑफीसमध्ये थोडी डुलकी घेतल्याने एका कर्मचाऱ्याला थेट नोकरीवरूनच काढून टाकण्यात आले. यानंतर कर्मचाऱ्याने कंपनीला असा धडा शिकवला की, 40 लाख रुपये एवढी भरपाई द्यावी लागली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोक प्रतिक्रियाही देत आहेत.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ही घटना चीनमधील जिआंगसू प्रांतातील आहे. यथे एका झांग नावाच्या व्यक्तीने डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मॅनेजर म्हणून आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत उत्कृष्ट सेवा दिली. मात्र, याच वर्षाच्या सुरुवातीला एका मध्यरात्रीच्या सुमारास झांग स्टोअरच्या कॅमेऱ्यात डुलकी घेताना आढळून आले. यानंतर एचआरने 'अनुशासनहीनते'चे कारण देत त्यांना नोकरीवरून काढून टाकले.
झांग यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला -
यानंतर, झांग यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने झांग यांच्या बाजूने निकाल दिला आणि 'कामा दरम्यान झोपणे ही पहिलीच चूक आहे. यामुळे कंपनीचे काही फार मोठे नुकसान झाले नाही. 20 वर्षांच्या निष्ठेच्या सेवेनंतर अशा प्रकारे काढून टाकणे चुकीचे आहे," असे म्हटले आहे.
कंपनीला द्यावी लागली भरपाई -
न्यायालयाने कंपनीला झांग यांना 40 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर झांग यांची ही सोटी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. लोक कंपनीच्या हेतूवर टीका करत आहेत आणि झांग यांच्या निर्धाराचे कौतुक करत आहेत.