देशातील कोणत्या शहरात पहिल्यांदा वीज पोहोचली? कुठे बसवले सर्वात आधी पथदिवे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 05:14 PM2022-09-30T17:14:37+5:302022-09-30T17:15:17+5:30

Where Did Electricity Reach First: शहरांशिवाय आता देशातील खेडीही विजेच्या प्रकाशाने उजळून निघाली आहेत.

the country had electricity for the first time india | देशातील कोणत्या शहरात पहिल्यांदा वीज पोहोचली? कुठे बसवले सर्वात आधी पथदिवे? जाणून घ्या...

देशातील कोणत्या शहरात पहिल्यांदा वीज पोहोचली? कुठे बसवले सर्वात आधी पथदिवे? जाणून घ्या...

googlenewsNext

आज देशातील जवळपास सर्वच भागात वीज पोहोचली आहे. शहरांशिवाय आता देशातील खेडीही विजेच्या प्रकाशाने उजळून निघाली आहेत. पण एक काळ असा होता की, देशात वीज व्यवस्था नव्हती. त्यानंतर पहिल्यांदाच देशातील एखादे शहर विजेने उजळून निघाले.  देशातील कोणत्या शहरात सर्वात आधी वीज पोहोचली. तसेच, देशातील दुसर्‍या शहरात पहिल्यांदा पथदिवे (स्ट्रीट लाइट) लावले असले तरी, जे केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील शहरात पहिले इलेक्ट्रिक स्ट्रीट लाइट होते, याबाबत जाणून घेऊया...

या शहराला पहिल्यांदा मिळाली वीज 
भारतात पहिल्यांदा कोलकात्याला (तेव्हाचे कलकत्ता) विजेची सुविधा मिळाली होती. 1979 मध्ये या शहरात पहिल्यांदा विजेची व्यवस्था करण्यात आली होती, त्यानंतर 1981 मध्ये दुसऱ्यांदा विजेची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय 5 ऑगस्ट 1905 रोजी बंगळुरूमध्ये आशियातील पहिला इलेक्ट्रिक स्ट्रीट लाइट बसवण्यात आला होता.

पहिल्यांदा जलविद्युत निर्मिती
भारतात पहिल्यांदा 1897 पासून जलविद्युत निर्मिती झाली. त्यानंतर दार्जिलिंग नगरपालिकेसाठी सिद्रापोंग येथे जलविद्युत केंद्राची स्थापना करण्यात आली. दरम्यान, दार्जिलिंग हे पश्चिम बंगाल राज्याच्या अंतर्गत येते.

वीजनिर्मितीत भारत आघाडीवर
एक काळ असा होता की देशाची गावे तर दूरच, पण मोठ्या शहरांमध्येही नीट वीज मिळत नव्हती. पण आज भारत जगातील अव्वल वीज उत्पादक देशांपैकी एक आहे. आपल्या देशात जल, औष्णिक आणि अणुऊर्जा तसेच सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचवण्यासाठी सर्व सरकारी योजना भारत सरकारने चालवल्या होत्या.

अक्षय ऊर्जेवर लक्ष केंद्रित
वाढते पर्यावरणीय प्रदूषण आणि उच्च इंधनाचा वापर इत्यादी लक्षात घेऊन अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज निर्मितीवर भर देण्यात आला आहे. विशेषत: सौरऊर्जेच्या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. याशिवाय, पवनऊर्जा आणि पाण्यापासून होणारी वीजनिर्मितीही अक्षय आणि स्वच्छ ऊर्जेअंतर्गत येते.

Web Title: the country had electricity for the first time india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.